रासायनिक खतांचे वाढवलेले दर मागे घ्या नितेश मेश्राम यांची मागणी

0
666

रासायनिक खतांचे वाढवलेले दर मागे घ्या नितेश मेश्राम तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी यांची मागणी

गोंडपीपरी(सूरज माडुरवार)

दिनांक 17 मे रोजसोमवारला माननीय तहसीलदार साहेब तालुका गोंडपिपरी यांच्या मार्फ त जिल्हाधिकारी चंद्रपूर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय पंतप्रधान भारत सरकार दिल्ली यांना पेट्रोल डिझेल गॅस तर रासायनिक खते यांच्या किमती मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे खताच्या किमतीमध्ये 40 टक्के वाढ करून केंद्र सरकारने अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला अजून आर्थिक संकटात ढकलण्याचे काम केले आहे. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घेण्याऐवजी भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत शंभर रुपयांच्या वर पेट्रोलचे दर गेले आहे. केंद्र सरकारने दरवाढ करू न जनसामान्यांना धक्का दिला आहे खताच्या किमती भरमसाठ वाढण्याचं काम भारत सरकारने केले आहे जो डी ए पी खत सतराशे 85 रुपयाला मिळणारे डीएपी खताचे दर 715 रूपयाने वाढवून शेतकऱ्यांना 1900 रुपये मिळणार आहे. खताची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी नितेश मेश्राम राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष नेतृत्वात गोंडपीपरी कुणाल गायकवाड,राजुरा विधानसभा युवक अध्यक्ष अरुण वासलवार,जेस्ट नेते संदीप ईटेकर, जयेश कार्पेनवार,युवक अध्यक्ष प्रमोद दुर्गे ,सामाजिक न्याय अध्यक्ष सुमीत मेश्राम, भीम देवतळे, भारत देवतळे, मनोज दुर्गे, अरविंद गोंगले सहित अन्य राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here