सेवार्थी येलेकर कुटुंब धावले युवकांच्या मदतीला

0
634

‘सेवार्थी’ येलेकर कुटुंब धावले युवकांच्या मदतीला

कोणत्याही कुटुंबासोबत एखादी सर्वसाधारण दुख:द घटना घडली तरीही ते कुटुंब त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच कालावधी लागतो, हे सर्वश्रुत आहे. यातच एखाद्या कुटुंबातील कर्तापुरुष काळाने आपल्यातून हिरावून घेतल्यानंतर त्या कुटुंबायांची काय अवस्था असू शकते, यांची कल्पना न केलेली बरी. तरीही समाजसेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंब स्वस्थ बसू शकत नाही, हे व्यावसायाने शिक्षक असलेले येलेकर दाम्पत्यांनी आज दाखवून दिले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील 22 दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या कुटुंबाची काय स्थिती असते, हे येलेकर दाम्पत्यांनी मागील पंधरवड्यात अनुभवली आहे; नव्हे तर त्या कुटुंबातील येलेकर सरांचे लहान बंधू स्व. गुलाबराव येलेकर ( ५०वर्ष) यांना कोरोनाने हिरावून नेले. अशाही परिस्थितीत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या भोजन वितरण कार्यक्रमात सहभागी होऊन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रा. शेषराव येलेकर, प्रा. संध्या येलेकर व त्यांच्या दोन मुलीं शिवानी व संजना येलेकर यांनी केला. स्वत:च्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले असताना इतरांच्या दु:खात सहभागी होण्याकरिता युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना करण्यात येत असलेल्या भोजन वितरण उपक्रमात सहभागी होऊन युवकांचे मनोबल व रुग्णांच्या नातेवाईकांना हिम्मत देण्याचे काम येलेकर दाम्पत्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here