नगर परिषद प्रशासनाचा जनतेच्या आरोग्याशी खेळ
देशपांडे वाडीत पिण्याच्या पाण्यात आढळला जिवंत “नारू”
राजुरा, अमोल राऊत (१६ मे) : नगर परिषद प्रशासनातील पाणी पुरवठा विभागाचा गफिलपणा चव्हाट्यावर आला आहे. देशपांडे वाडीतल सेवानिवृत्त शिक्षक नारायण गिरी यांच्या घरी सकाळच्या पाणी पुरवठा नळाद्वारे जिवंत “नारू” आढळून आला आहे. पाणी पुरवठा विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा हा प्रकार उजेडात आला असून शहरातील जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या देशभरात कोव्हिड-१९ ने चांगलेच थैमान घातले आहे. यामुळे जनतेकडून आपली व कुटुंबाची काळजी घेतली जात आहे. मात्र अशातच नगर परिषद प्रशासन मात्र गाढ झोपेत असून जनतेला आरोग्याच्या खायीत ढकलत आहे. यामुळे अशा बेजबाबदार पाणी पुरवठा विभागा वर नगर परिषद प्रशासनाकडून योग्य अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाच्या भोंगळ व ढिसाळ कार्यप्रणालीची पोच पावती आहे.