वडनेर ग्रामीण रुग्णालयाची पालकमंत्री सुनील केदार यांनी केली पाहणी
हिंगणघाट, अनंता वायसे(१५ मे) : ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत पालकमंत्री सुनील केदार यांनी पाहणी केली. ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे पालकमंत्री सुनील केदार यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली सोबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे उपस्थित होते .त्यावेळी डॉक्टर यांच्यासोबत चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.
ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तसेच ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत 05 मे 2021 ला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व सरपंच कविता वानखेडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना मागणी केली होती.
त्यानिमित्त आज वडनेर येथे जाऊन ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर तिन दिवसाच्या आत कोविड सेंटर सुरु करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. ग्रामीण रुग्णालय वडनेरच्या आजूबाजूला ४४ खेडी असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०७ वर आहे. वडनेर हे गांव नागपूर ते हैद्राबाद महामार्गावर असून खूप मोठ्या प्रमाणात ट्रक व इतर गाड्यांची वाहतूक आहे. वडनेर या गावाला बँक ,पोलीस स्टेशन, शाळा ,महाविद्यालय, बाजार पेठ असल्यामुळे परिसरातील जनतेचा थेट संपर्क आहे. लसीकरण केंद्र नसल्यामुळे नागरिकांना हिंगणघाट जावे लागते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता एसटी बसेस बंद असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे. नागपूर ,वर्धा येथील कोरोना सेंटर मध्ये बेड उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण सेवा अपुरी पडत आहे कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रतिबंधनात्मक उपयोजना करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन असून सुद्धा त्या प्रमाणात कोरोनाचा प्रकोप कमी झालेला दिसत नाही. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास विलंब होत आहे त्यामुळे रुग्णांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर येथे कोविड सेंटर सुरू करण्या संबंधी तसेच ऑक्सिजनचा पुरवठा व ऑक्सीजन प्लांट निर्माण करण्यात यावा व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्या संबंधी पालकमंत्री सुनील केदार यांनी ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे जाऊन पाहणी केली. त्या वेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ,सरपंच कविता वानखेडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, उपसरपंच सुभाष शिंदे, संजय भोयर ,सुनील कळस्कर, गजानन तागडे ,दसरथ दुर्गे, सुनील मून, घनश्याम भगत,चंद्रशेखर ब्राह्मणे, आरिफ शेख तसेच वडनेर ग्रामवासी इत्यादी उपस्थित होते.