आज करूया वृक्ष संवर्धनाची सेवा, उद्या आम्हा वृक्ष देणार शुद्ध ऑक्सिजनचा मेवा

0
817

आज करूया वृक्ष संवर्धनाची सेवा, उद्या आम्हा वृक्ष देणार शुद्ध ऑक्सिजनचा मेवा

विर शिवाजी युवामंच घारगांव यांचा कौतुकास्पद उपक्रम

चामोर्शी, सुखसागर झाडे : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या युक्ती प्रमाणे वागने कृती करणे आज काळाची गरज झाली आहे.
विर शिवाजी मंच घारगांव यानी सुद्धा विडा उचलला आहे, तनामनाने वृक्ष संवर्धनाची सेवा करीत आहेत.
आपल्याला कोरोणा या एका आजाराने दाखवुन दिले ऑक्सिजन ची किंमत‌ काय आहे‍.आज दुसऱ्या देशातून ऑक्सिजन विकत घेण्याची पाळी आली आहे. कित्येक लोकांना ऑक्सिजन च्या कमतरते मुळे त्यांचे प्राण गमवावे लागले आज आपल्याला ऑक्सिजन ची किंमत कळाली असणार माणूस झाडे तोडताना थोडाही विचार करत नाही आज सर्व जंगले माणसाने नाहीसे केले पण त्यांना एक झाड किती कायं देतो हे माणसाला कळालं नाही. आपल्याला एक मोठे झाड दररोज २३० लिटर ऑक्सिजन देत असते सिमेंट कॉंक्रिटच्या वाढत्या वापरामुळे वातावरणात बदल झाले.वृक्ष तोडीने जंगल नाहिसे झाले. त्याचा परिणाम पर्यावरणावर दिसून आला आपल्याला जगायचे असेल तर झाडे लावली पाहिजे त्यांचे योग्य संवर्धन केले पाहिजे. करोना रुग्णांना शुद्ध ऑक्सिजनची कीमत कळली आहे.कोरोणा रूग्णांनी बरे होऊन घरी परतल्यावर उपक्रम म्हणून एक झाड अवश्य लावा परत ही वेळ येणार नाही बरे होऊन घरीआल्यानंतर हा उपक्रम राबवावा असे कृतीयुक्त आव्हान सर्व जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here