वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत आरोग्य सेवा व धान्य किट चे वाटप…
चंद्रपुर – सम्पूर्ण देशात कोरोना मुळे भयावह वातावरण निर्माण झालेले आहे. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्या सोबतच पोटाचा प्रश्नहि निर्माण झाला आहे. सरकार वरचेवर लॉक डाउन जाहिर करत आहे मात्र कोणतीही भरघोस अशी मदत सरकार करत नाही. आरोग्य सेवे बाबत तर सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. लोकडाउन च्या पुढे सरकारला दूसरे काहीच सुचत नाही आहे. जवळपास 1 वर्षाचा कालावधि लोटून गेला मात्र अद्याप पर्यन्त रुग्णांसाठी पुरेसे साधन उपलब्ध करण्यास सरकार अपयशी ठरलेल आहे. अश्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. अड़. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व सामान्य नागरिकाना जमेल ती मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमिवर वंचित बहुजन आघाडी चंद्रपुर जिल्हा महासचिव यांनी चंद्रपुर शहरातील बाबूपेठ परिसरात मोफत धान्य किट वाटप व मोफत आरोग्य केन्द्राची सुरुवात मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरु केले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक मा.राजुभाऊ झोड़े, जिल्हाध्यक्ष प्रवीण गावतुरे,जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, सुभाष थोरात, कृष्णाक पेरकावार,रूपचंद निमगड़े,सुभाषचंद्र ढोलने, लताताई साव,ईशान रामटेके, विष्णु चापडे,लीलाधर वाकडे,प्रज्ञाशील सहारे,सतीश खोब्रागडे, संपत कोरडे,अशोक पेरकावार, विशेष निमगडे,प्रज्ञा रामटेके,सुलभाताई चांदेकर,प्रतिभा रामटेके,सुनील भसारकर,सोनल वाळके,रमा मेश्राम,कुमारवार ताई,अशुल भसारकर,इत्यादि उपस्थित होते.