*शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कृतीतून निर्माण केला आदर्श*
*एक हाथ मदतीचा उपक्रमान्तर्गत शिक्षकांनी निर्माण केली मायेची सावली*
*युवा संकल्प सस्थेचा मदतीचा हात व मोलाचे योगदान*
सूखसागर झाडे चामोर्शी:-भारतात सध्या को*शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कृतीतून निर्माण केला आदर्श*
*एक हाथ मदतीचा उपक्रमान्तर्गत शिक्षकांनी निर्माण केली मायेची सावली*
*युवा संकल्प सस्थेचा मदतीचा हात व मोलाचे योगदान*रोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांचे हाल होताना दिसतात. बेड,ऑक्सीजन,औषधी,एम्बुलंस मिळत नाही तर बऱ्याच लसिकरण केंद्रात लस उपलब्ध नाही तसेच सावलीची व्यवस्था सुद्धा नाही. लसीकरनाच्या ठिकाणी भर उन्हात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
संपूर्ण देशभरात या कोरोना विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये विविध घटक सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रकारची मदत करीत आहेत. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील शिक्षकवृंदानेही पुढे येत या लढ्यात आपलाही सहकार्याचा हात असावा या दृष्टीने सोशल मीडिया द्वारे मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत चामोर्शी मध्ये कार्यरत शिक्षक,प्राध्यापक सोबतच तालुका व जिल्ह्याबाहेरील शिक्षक व इतर दात्यांनी सुद्धा या मदतीत अमूल्य अशी भर घातली.
एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत जमा झालेल्या निधीतुन सर्वानुमते ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कायमस्वरूपी पत्र्याचा शेड बांधला.तसेच चामोर्शी अंतर्गत येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा, घोट, कोनसरी, रेगडी आमगाव, मार्कन्डा क., ग्रामिण रुग्णालय आष्टी व लसीकरण केंद्र ठाकरी येथे लसिकरण केंद्रासमोर हिरवी नेट बांधून मायेच्या सावलीची व्यवस्था केली. लसीकरनाच्या वेळी सामान्य लोकांची आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने भर उन्हात त्यांना तासनतास उभे रहावे लागत आहे.त्यामुळे चक्कर येणे,बीपी वाढने व इतर समस्या तयार होत होत्या.आता या कायमस्वरूपी शेड व हिरव्या नेट ची व्यवस्था शिक्षकांकडून केल्यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त होत आहे.
सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रविण पोटवार, आशिष जयस्वाल, प्रदिप भुरसे, सुजित दास, माणिकचंद रामटेके, संतोष गुट्टे व सचिन गायधने या शिक्षकांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे या उपक्रमात युवा संकल्प संस्था भेंडाळा जि. गडचिरोली यांनी हिरिरीने सहभागी होऊन खूप मोलाचा हातभार लावला. त्यामध्ये युवा संकल्प संस्था चे अध्यक्ष राहुल वैरागडे, उपाध्यक्ष चेतन कोकावार, सुबिर मिस्त्री, विशाल बंडावार, प्रशांत कुसराम, वैभव मंगर यांनी सहकार्य केले व पुढेही याप्रकारची मदत सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
उत्तम संस्कारातून नवी पिढी घडविणा-या शिक्षकांनी व युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या मदतीच्या कृतीतून समाजासमोर ठेवला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या बद्दल ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.लिला मदने,डॉ.शेषराव भैसारे,औषध निर्माण अधिकारी प्रतीक पुनप्रेड्डीवार,राजेश ढाले,उमेश राठोड,कुशल कवठेकर,चन्द्रकांत गव्हारे आणि समस्त रुग्णालयीन कर्मचारीच्या वतीने या महत्वाच्या सोयीबद्दल आभार मानले आहे.