संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त १० मे एक सोनेरी दिवस
सेवा संकल्प हॅपीगृप नागपूर, स्नेहांचल हॅपीगृप नागपूर द्वारा रक्तदान
नागपूर/प्रतिनिधी, (११ मे) : १० मे या दिवशी सहा वर्षांपूर्वी माझ्या सर्व सखी सह समाजसेवेचा संकल्प केला होता. जो आजतागायत अखंड चालू आहे. या तारखेला सेवा संकल्प हॅपी गृप नागपूर तर्फे रक्तदान करण्यात आले. प्रत्येक सखीने एकेक कुटुंबाला महिनाभर पुरेल एवढी धान्य किराणा किट दिली.
या कोरोना माहामारी च्या काळात आमची मदत अगदी अल्प आहे. तरीही एक खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न. असे मत यावेळी ग्रुप सखी तर्फे व्यक्त करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ अंजली देशमुख घंटेवार, गिता शिंदे, वैशाली येवले मिनाक्षी सुखदेव, गौरी तिवारी, मिनाक्षी भोयर, कांचन चट्टे, अर्चना बारमाटे, सुनिता कांबळे, सुनिता चिमनकर, पुष्पा चौरे, आशा बर्गे, समिधा चव्हान, माधवी गंगथेडे आदी सदस्या उपस्थित होत्या.
सेवा संकल्प हॅपीगृप नागपूर, स्नेहांचल हॅपीगृप नागपूर
यांच्या द्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.