नारंडा येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर काम दालमिया सिमेंट कंपनींनीने केले कसे? – प्रदिप मालेकर
वनविभागाचा तलाव असतांना परवानगी का घेतली नाही.?
कंपनी रोजगार हमीच्या मजुरांना मोबदला देणार का?
कोरपना : नारंडा येथे वनविभागाअंतर्गत तलाव असून त्या तलावाचे खोलीकरण करण्याकरिता रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मंजूर करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांना करण्यात आली होती व काम मंजूर झालेले होते.सदर कामातून गावातील स्थानिक ५०-६० लोकांना एक महिण्याकरिता रोजगार मिळणार होता परंतु दालमिया सिमेंट कंपनीने वनतलाव खोलीकरणांची वनविभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक असतांना कोणतीही परवानगी न घेता परस्पर काम केले. यातून स्थानिक रोजगार हमी च्या लोकांचा एक महिन्याचा रोजगार हिरावला.आता दालमिया सिमेंट कंपनी रोजगार हमी मजुरांना रोजगार देणार का? यासंबंधी योग्य ती चौकशी करून दालमिया कंपनीवर कार्यवाही करावी व रोजगार हमीच्या मजुरांना एक महिन्याच्या मोबदला द्यावा अशी मागणी गावातील कार्यकर्ते प्रदिप मालेकर यांनी केलेली आहे.