आता ई-पास मशीनवर ग्राहकांना नाही द्यावा लागेल अंगठा
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली होती मागणी
माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या मागणीची यश
हिंगणघाट, अनंता वायसे (०८ मे) : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला २४ एप्रिल २०२१ ला माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मागणी केली होती त्या मागणीला यश आले असून सरकारने दखल घेतली आहे . त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानांमधून अन्नधान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी त्यांचे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटप करण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र लाभार्थ्याने स्वत: रास्तभाव दुकानात उपस्थित राहणे आवश्यक आहे,असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भावाने थैमान घातले आहे दिवसेंदिवस कोरोना बाधितांमध्ये वाढ होत असून मृत्यूचे सुद्धा प्रमाण वाढत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने मे महिन्यापासून प्रति माणूस ०५ किलो धान्याचा मोफत वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानात अनेक ग्राहकांचा थेट संपर्क एकमेकाशी येतो. शिवाय धान्य वाटप करताना ग्राहकांना थम मशीनवर थम देणे आवश्यक आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढू शकते किंवा कोरोना वाडीमध्ये हेसुद्धा एक कारण राहु शकते. तरी प्रशासनाने दखल घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धान्य दुकानदारांच्या थमवर ग्राहकांना धान्य वितरित करण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानातून धान्य विक्री करताना ग्राहक व विक्रेता यांचे थम घेण्यात येते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.अशी सुचना माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी सरकारला केली होती.
ग्राहकांची गर्दी लक्षात घेता वारंवार अंगठा निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत काही कालावधीसाठी थम प्रक्रिया थांबविण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली होती.त्या मागणीला यश आले असून आता ई-पास मशीन वर ग्राहकांना आंगठा द्यावा लागणार नाही.हि मागणी पुर्ण झाल्या मुळे सर्व दुकानदारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
प्रतिक्रिया:- शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राशनकार्ड धारकांची थंब प्रक्रिया थांबून दुकानदाराच्या थंबवर धन्य वितरित करण्यात यावे अशी मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाली असुन त्या मागणीला यश आले आहे. तसेच कोविडच्या प्रादुर्भावाने जे स्वस्त धान्य दुकानदार मरण पावले त्यांना सरकारतर्फे ५० लाख रुपयांच्या विमा कवच देण्यात यावा व त्या दुकानदारांच्या पत्नी किंवा वारसांच्या नावावर त्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना करण्यात यावा अशी मागणी सुद्धा केली आहे.
– माजी आमदार प्रा.राजु तिमांडे