राजुरा शहराला 220 kv चे सब स्टेशन सुरू करण्याची सुरज ठाकरे यांनी केली ऊर्जामंत्र्यांना मागणी

0
735

राजुरा शहराला 220 kv चे सब स्टेशन सुरू करण्याची सुरज ठाकरे यांनी केली ऊर्जामंत्र्यांना मागणी

राजुर/अमोल राऊत : शहराची वाढती संख्या पाहता गेल्या अनेक दिवसांपासून सद्यास्थिती मध्ये शहरातील वीज पुरवठा गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. तथा थोडा वारा जरी आला तरी विद्युत तारांच्या गुंतागुंतीमुळे समस्या होऊन वीज सातत्याने जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
यामुळे लॉकडाऊन काळात देखील राजूरा येथील जनता हैराण झालेली आहे. मुलांचे ऑनलाइन शिक्षण देखील बरेच वेळा रात्रभर वीज नसल्याने मोबाईल लॅपटॉप चार्ज करू न शकल्यामुळे ऑनलाइन शिक्षण रखडले आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये लोकांना रात्रही उघड्यावर किंवा गर्मीमध्ये घालवावे लागत असल्याने शहरातील जनता त्रासली आहे. हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न लक्षात घेता युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी थेट ऊर्जामंत्री यांना निवेदनाद्वारे राजुरा शहर मध्ये 220 kv चे स्टेशन कार्यान्वित करून सर्व विद्युत तारा या अंडरग्राउंड करण्याची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी मेल द्वारे ऊर्जा मंत्र्यांना दिली असून फोनवर संपर्क करून त्यांना राजुरा शहरातील या समस्येबाबत अवगत केले आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील शक्य तितक्या लवकर हा प्रश्न मार्गी लावण्या बाबत सकारात्मक उत्तर सुरज ठाकरे यांना दिल्याचे सुरज ठाकरे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here