वडनेर ग्रामीण रुग्णालयाची माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली पाहणी

0
802

वडनेर ग्रामीण रुग्णालयाची माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली पाहणी

ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे कोविड सेंटर व कोरोना प्रतिबंधित लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

हिंगणघाट, अनंता वायसे (०६ मे ) : ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली व डॉक्टर यांच्यासोबत चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणघाट तालुका अध्यक्ष व ग्रा. प वडनेरचे माजी सरपंच विनोद वानखेडे व इतर सहकारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तसेच ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा तसेच जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालय वडनेरच्या आजूबाजूला ४४ खेडी असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०७ वर आहे. वडनेर हे गांव नागपूर ते हैद्राबाद महामार्गावर असून खूप मोठ्या प्रमाणात ट्रक व इतर गाड्यांची वाहतूक आहे. वडनेर या गावाला बँक ,पोलीस स्टेशन, शाळा ,महाविद्यालय, बाजार पेठ असल्यामुळे परिसरातील जनतेचा थेट संपर्क आहे. लसीकरण केंद्र नसल्यामुळे नागरिकांना हिंगणघाट जावे लागते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता एसटी बसेस बंद असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे. नागपूर ,वर्धा येथील कोरोना सेंटर मध्ये बेड उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण सेवा अपुरी पडत आहे कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रतिबंधनात्मक उपयोजना करणे आवश्यक आहे. लॉकडाऊन असून सुद्धा त्या प्रमाणात कोरोनाचा प्रकोप कमी झालेला दिसत नाही. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास विलंब होत आहे त्यामुळे रुग्णांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
तरी प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा व ऑक्सीजन प्लांट निर्माण करण्यात यावा व लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशा या सर्व मागणीकरिता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा , जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here