वढोलीत पार पडले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर
१०० नागरिकांनी टोचली कोविड लस
गोंडपिपरी (सूरज माडूरवार)
मागील वर्षीपासून कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जगाला कोरोनाचा सामना करावा लागत आहे. या महामारीमध्ये लाखो लोकांना प्राण गमवावा लागत आहे. अश्यातच संपूर्ण भारतामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. त्याचअनुषंगाने दि.६ गुरुवारी वढोली येथील जिल्हा परिषद शाळेत ४५ वर्ष वरील नागरिकांना लस देण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी ४५ वर्ष वरील १०० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून शिबिराचा लाभ घेतला. यावेळी धाबा वैधकीय अधिकारी प्रणिल पत्रीवार, आरोग्य विभागाचे डॉ.आखाडे, शंकर काणकाटे, निंमगडे, कींनाके, सरपंच राजेश कवठे, उपसरपंच देवाडे, ग्रा.स संदीप पौरकार, ग्रामसेवक विनोद झिले, पोलीस कर्मचारी सरजू कातकर, सामाजिक कार्यकर्ता सूरज माडूरवार,मुख्यध्यापक बोरीकर, माजी सरपंच ईटेकर, ग्रा.पं कर्मचारी भारत लांबाडे, मोरेशवर उपासे, छबु कारेकर यांची उपस्थिती होती. संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे, ठाणेदार संदीप धोबे यांनी सदर शिबिराला भेट दिली.