कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते उपज़िल्हा रुग्णालय हिंगणघाट ला केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या विशेष प्रयत्नाने 15 Oxygen Concentrator भेट

0
687

कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते उपज़िल्हा रुग्णालय हिंगणघाट ला केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या विशेष प्रयत्नाने 15 Oxygen Concentrator भेट

हिंगनघाट, अनंता वायसे (5 मे) : केंद्रीय दळनवळन मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांचे प्रयत्नातुन प्राप्त झालेले 15 Oxygen Concentrator आ. समीरभाऊ कुणावार यांचे हस्ते हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयाला हस्तातंरीत करण्यात आले. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन सर्वत्र थैमान घातले आहे.मोठ्या प्रमाणावर रुग्नसंख्या सुद्धा वाढत आहे. आमदार समीरभाऊ कुणावर हे Oxygen Concentrator च्या शोधामध्ये होते महाराष्ट्रात कुठेही Oxygen Concentrator कुठल्याच कंपनीचे उपलब्ध नाही देशांमध्ये अनेक ठिकाणी प्रयत्न केले मिळाले नाही आणि जास्त पैसे मोजूनही Oxygen Concentrator मिळत नाही. याची सक्त आवश्यकता होती आणि आज 15 Oxygen Concentrator केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या विशेष प्रयत्नाने मिळाले असून ते आज हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला 15 नग Oxygen Concentrator दिले त्यामुळे 15 अतिरिक्त बेड या ठिकाणी परत आता नव्याने सुरू होऊ शकतात या अगोदर सुद्धा 09 नग पोर्टेबल वेंटिलेटर ( NIV) सुद्धा दिलेल्या आहे म्हणजे आता 25 बेडची क्षमता येथील उपजिल्हा रुग्णालयाची वाढलेली आहे जेणेकरून येणारा प्रत्येक पेशंट तो कोणीही असो त्याला ऑक्सिजनची गरज पडल्यास त्याला ऑक्सिजन मिळाल पाहिजे ही भूमिका असून प्रत्येकाचा जीव हा किमतीचा आहे आणि त्याला ट्रिटमेंट मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून हे सर्व उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट या ठिकाणी उपलब्ध करून या रुग्णालयाला जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
औषधी, इंजेक्शन साठा आणि रेमडीसीवर सुद्धा नियमितपणे या रूग्णालयाला उपलब्ध होत आहे आणि आज Oxygen Concentrator दिल्याबद्दल डॉ. चाचारकर साहेब, नोडल अधिकारी डॉ. सौ. पाराजे मॅडम, हिंगणघाट चे तहसीलदार श्रीरामजी मुंधडा तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व टीमने आमदार समीरभाऊ कुणावार यांचे आभार माणून समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here