आमदार समीर कुणावार यांनी घेतली हिंगणघाट व समुद्रपुर दोन्ही तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, अधिकारी यांची व्हर्च्युअल (व्ही सी) सभा
हिंगणघाट, अनंता वायसे (४ मे) : समुद्रपूर तालुक्याची व हिंगणघाट तालुक्याची व्हर्च्युअल सभा झाली दोन्ही तालुक्यातील वेगवेगळ्या सभा झाल्या असून तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, जि प सदस्य, प स सदस्य, येथील मेडिकल ऑफिसर, DHO, तालुका वैद्यकीय अधिकारी, SDO, तहसीलदार, BDO, सभापती हजर होते. या सभेचे नीयोजन पंचायत समिती हिंगणघाट व पंचायत समिती समुद्रपूर यांच्या तर्फे नियोजन करण्यात आले.
सभेला मोठ्या प्रमाणात सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी हजर होते. या सभेला सर्वप्रथम जि. प. च्या आरोग्य सभापती सौ. मृणालताई माटे यांनी संबोधित केले त्याच प्रमाणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिनजी मडावी, तालुका अधिकारी हिंगणघाट, समुद्रपुर तसेच उपविभागीय अधिकारी, जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी श्री. डवले साहेब यांनीसुद्धा सभेला संबोधित केले.
ग्रामीण भागात कोरोना पेशंट वाढत असल्यामुळे कोरोना चा वाढता प्रादुर्भाव कसा कमी करता येईल याबाबत चर्चा झाली. यानंतर कोरोना संबंधी सूचना देण्यात आल्या गावातील ग्रामपंचायत च्या माध्यमातून गावात निर्जंतुनीकीकरण करणे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये असलेले सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील या सर्वांची दक्षता कमिटी असून त्या दक्षता कमिटी ची रोज गावात ग्रामपंचायत मध्ये बैठक घेण्यात यावी. गावातील असलेले ॲक्टिव रुग्णांची यादी करून ॲक्टिव्ह रुग्णांना औषधी मिळाले की नाही त्यांनी औषधोपचार केला की नाही याची माहिती दक्षता समितीने घ्यावी. आशा वर्कर यांनी गावातील पेशंट ची माहिती ग्रामपंचायतला व वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी. त्याचप्रमाणे त्यांना घरपोच औषधी सुविधा पोचवावी गावातील जर कोणाला लागण झाल्याचे दिसले असता तात्काळ दवाखान्यात जाऊन डॉक्टरांची सल्ला घ्यावी किंवा चाचणी करून घ्यावी जेणेकरून गावातूनच आपण कोरोना थांबविला तर रुग्ण वाढ होणार नाही यातून लोकांचा जीव वाचेल म्हणून गावांमध्ये जनजागृती करावी गावामध्ये संचार बंदीचे पालन करावे जमावबंदी, सार्वजनिक कार्यक्रम तसेच विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आवर घालावा सोबतच औषधी साठा या विषयावर चर्चा केली असून औषधी किती आहे त्याबद्दल विचारणा केली त्याचप्रमाणे ग्रामीण भागात होत असलेल्या लसीकरणाचा वेग वाढवावा गावातील जनतेला लसीकरणाबाबत होत असलेला संभ्रम (गैरसमज) दूर करण्यासाठी जनजागृती करावी. त्यांना लसीकरण घेण्यासाठी विनंती करावी. गावातील जनतेचे जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे दक्षता समितीने यासंदर्भात रोजी बैठक घेऊन पंचायत समिती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबंधित माहिती कळवावी जेणेकरून गावात काही उपायोजना लागल्यास वरिष्ठां कडून मदत मागता येईल आणि सर्वांनी या संदर्भात पुढे यावं सर्व लोक प्रतिनिधींनी कोरोना साठी सर्व पक्ष भेद विसरून सर्वांसाठी एकत्र येऊन गावासाठी या कोरोणाच्या विरोधात लढा द्यावा..! असे आवाहन आमदार समीरभाऊ कुणावार यांनी व्हर्चुअल (V C) सभे मध्ये केले.