लाभार्थ्याऐवजी दुकानदारांचे ठसे घेण्याची मागणी
रास्त भाव दुकानदार संघटना चिमुर : यांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
विकास खोब्रागडे
पळसगांव (पिपर्डा) लाभार्थ्याचे ऐवजी रास्त भाव दुकानदार यांच्या बोटाचे ठसे अधि प्रमाणित करून पास मशिनद्वारे धान्य वितरणाची परवानगी द्यावी अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटनाचिमूर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे केली.सध्या कोरोणाचे रुग्ण संख्या आणि मृत्यू संख्या वाढत आहे त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव तसेच संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता लाभार्थ्याचे ठसे पास मशीन वर घेऊन धान्य विचारणामुळे रास्त भाव दुकानदार व कार्डधारक संक्रमित होण्याची शक्यता आहे.धान्य वितरणामुळे संसर्ग आणखी वाढू नये याकरिता लाभार्थ्यांऐवजी दुकानदाराच्या बोटाचे ठसे अधिप्रमाणित करून धान्य वितरण करण्याची परवानगी देण्याची मागणी रास्त भाव दुकानदार संघटना चिमूर यांनी केली आहे.त्याच प्रमाणे माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2020 मधील मोफत धान्य वाटप कमिशन अजून पर्यंत मिळाले नाही अशा मागणीचे निवेदन आज तहसीदार नागतीळक चिमूर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर आहे. या प्रक्रियेत रेशन दुकान व्यावसायिकांना कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे. त्यामुळे 1 मे पासून चिमूर तालुक्यातील सर्व रास्त धान्य दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. जर शासनाने थम लावण्याची अट रद्द केली तरच आम्ही संप मागे घेऊ,अशी भूमिका रास्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अद्यक्ष संजय पाटील यांनी स्पष्ट केली.या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयात पाठवूनही शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागणीचा विचार न केल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पुढे आक्रमक आंदोलन करण्यात येईल या वेळी, संजय पाटील अद्यक्ष,स्वस्त धान्य दुकानदार संघटना चिमूर,बबन बन्सोड सचिव ,वडाळा, अशोक तिडके नेरी,जनार्धन गोंडाने,तुषार शिंदे,देवराव दाडेकर ,ताराबाई हेडावु यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले,