वर्धा नदीवरील पूल ठरत आहे जीवघेणे
दुचाकीस्वार दुचाकीसह गेला वाहून
राजुरा (अमोल राऊत) : आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वार दुचाकीसह हवेच्या झोतामुळे वर्धा नदीच्या पुलावरून खाली नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. मात्र पोलिसांना वाहत्या पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकीस्वार व दुचाकी शोध लागला नाही. वाहून गेलेल्या इसमाची ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
बल्लारपूर व राजुरा तालुक्याच्या मध्ये वर्धा नदीवर पूल धोकादायक ठरत आहे. या पुलावर सध्या बाजूला उभे खांब नसल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडत असून मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत आहेत. सदर पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्याला जोडणारा हा महामार्ग असून या मार्गाने अवजड वाहतुकीसह मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. वर्धा नदीवरील हे पूल कालबाह्य झाले आहे. सदर पुलाची नव्याने निर्मिती करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडू कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. यामुळे पुलावर खड्डे पडून पाणी साचत आहे. पाणी साचल्यामुळे दिवसागणिक या खड्ड्यात भर पडत आहे. मात्र प्रशासनाकडू प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीकडे जाणिकपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे.
प्रवास करताना हवेच्या झोतामुळे दुचाकी स्वारांना मोठ्या प्रमाणात दुर्घटनेला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात काढण्यात येणाऱ्या बाजूच्या सुरक्षा खांबामुळे पुलावरून जातांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. याकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
“वर्धा नदीवरील पूल कालबाह्य झाले असून पुलावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. पावसाळा असल्यामुळे पुलावरील बाजूचे खांब काढण्यात आले आहे. हवेच्या दाबामुळे पुलावरून प्रवास करतांना मोठा धोका पत्करून प्रवास करावा लागतो. यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नवीन पर्यायी पुलाची निर्मिती करणे काळाची गरज ठरली आहे.”