चक्क बैलबंडीने लाभार्थ्यांना करावा लागतो प्रवास
‘हाक जरा जोमानं हाकं,
बाळा तुझी गाडी घुंगराची’
आज सर्वत्रच कोरोणांने कहर माजवला असल्याने चक्क लाकडाऊन मुळे ग्रामीण भागातील लोकांना प्रवासा करीता साधनांचा अभाव निर्माण झाला आहे. श्रावण बाळ निराधार योजना अंतर्गत वृद्ध नागरिकांना मिळणारे मानधन हे थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा होत असते. बॅंकेचा सदर व्यवहार हा लाभार्थ्यांना स्व:त हजर राहून करावा लागत असल्यामुळे अशा परिस्थितीत मोठी लाभार्थ्यांची तारांबळ उडत असते. सध्या ऊन्हांचा कडाका या पासून बचाव करण्यासाठी बैलबंडीस वरुन चादरीची छत बांधून अशीच स्थिती चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथील नागरिकास चक्क बैलबंडीने प्रवास करून थेट बॅंकेत जाण्याची वेळ आली आहे.