पोर्ला येथील रेती तस्करी प्रकरणी कंत्राटदार ,महसूल व खनीकर्म विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची सीआयडी चौकशी करा! – आमदार होळी
पोटेश्वर घाटाप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या संगनमताने केली जाते अवैद्यपणे रेती तस्करी
रेती तस्कर अन्य कोणी नसुन अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती कंत्राटदाराच रेती चोर आहेत. रेती कंत्राटदारच अवैधपणे रेतीची साठवणूक करून त्यास अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती तस्करीचे प्रकरण बनवीत असल्याचा आरोप आमदार होळी यांनी केला. पोटेश्र्वर रेतीघाटासाठी अर्ज करणाऱ्याची चौकशी करा. पंचनामे करणारे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी, खनीकर्म अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने जिल्हयात अवैधपणे रेती चोरी करणारा मोठा रॅकेट सक्रिय आहे. जिल्हयातील रेती कंत्राटदारांची व संबधित अधिकारी व कर्मचारी यांच्या संपत्तीची चौकशी करा. अशी मागणी आमदार होळी यांनी केली.
पोर्ला येथील पोटेश्वर घाटावर रेती तस्करी व साठवणूकीचे पंचनामे होऊनही अजूनपर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नसून यामध्ये रेती घाट घेणारा कंत्राटदाराच रेती चोर असून थातूरमातूर पंचनामे करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे तलाठी ,मंडळ अधिकारी, व खणीकर्म अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार डॉ देवराव जी होळी यांनी केली आहे.
जिल्ह्यात रेतीघाट घेणारे कंत्राटदार दररोज रात्री अवैधपणे रेतीचा उपसा करून अवैद्य ठिकाणी रेतीची साठवणूक करतात व त्या ठिकाणी धाड पडून पंचनामे झाल्यास त्याला अवैद्य तस्कर असल्याचे सांगून प्रकरण संगनमताने दडपून टाकतात.संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात अशाच प्रकारे रेती घाट घेणारे कंत्राटदार, महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यामार्फत मोठ्या प्रमाणात रेती चोरी करीत आहेत. अज्ञात रेती तस्करांवर नाममात्र गुन्हे दाखल करण्यात येत आहे. रेती तस्करी प्रकरणी पंचनामे होत आहेत मात्र अजून पर्यंत एकाही रेती तस्करा वर गुन्हा दाखल होऊन शिक्षा झालेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होउनही जिल्ह्यात गुन्हे दाखल व शिक्षा का होत नाही असा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये महसूल बुडत असून त्यास जबाबदार असणारे कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी या सर्वांची सीआयडी मार्फत चौकशी होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे नियमित घाट घेणाऱ्या कंत्राटदारांची व त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची ही चौकशी करण्यात यावी अशी मागणीही आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली आहे.