कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन

0
676

कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन

लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान

चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्हयातील सर्व नागरिकांकरिता कोविड लसिकरणाबाबत काही शंका तथा माहिती व मार्गदर्शन करिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर सुरु करण्यात आले असुन सदर केंद्राचे हेल्प लाईन क्र. 07172-254208 आहे.

आज दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक तथा कोविड-19 इंसिडंट कमांडर डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण केंद्र रुम क्र. 8, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर चे उद्घाटन जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. सदिप गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यात कोविड-19 आजारावर नियंत्रण व उपाययोजना म्हणुन वयोगट 45 व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसिकरण करण्यात येत असुन दिनांक 1 मे 2021 पासुन वयोगट 18 व त्यावरील सर्व वयोगटातील व्यक्तींना कोविड लसिकरण करण्यात येणार आहे. सर्व जनतेकरिता कोविशिल्ड व कोव्हॉक्सीन असे दोन्ही लसिचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोविशिल्ड व कोव्हॉक्सीन ह्या दोन्ही लसींना भारत सरकारची मान्यता असुन दोन्ही लस पुर्णपणे सुरक्षीत व प्रभावी आहेत, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये व कोणत्याही प्रकारची शंका किंवा भीती बाळगता लस घ्यावी.

तसेच कोविड लसिकरण संदर्भात नोदंणी करिता मार्गदशन, शंका तथा काही समस्या उद्भवल्यास उपरोक्त हेल्पलाईन क्रमांकावर  सकाळी 9 ते सायंकाळ 6 या कालावधी दरम्यान संपर्क साधुन माहिती व मार्गदर्शन प्राप्त करुन घ्यावी, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष मोटे, सल्लागार रामेश्वर बारसागडे, तसेच आशा बावणे, अश्विन सावलीकर, योगेंद्र इंदूरकर व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here