प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख मा. जयंतभाऊ तिजारे यांनी निवेदनाची दखल घेत सिंदी रेल्वे येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट
हिंगणघाट/प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख मा. जयंत भाऊ तिजारे यांनी निवेदनाची दखल घेत व वारंवार सिंधी रेल्वे आरोग्यवर्धिनी केंद्राची तक्रार येत असल्याबद्दल दि.24/04/2021 रोज शनिवार ला सिंधी रेल्वे आरोग्यवर्धिनी केंद्राला आपल्या सहकाऱ्यांसोबत भेट दिली त्यावेळेस आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा वंजारी यांच्याशी दवाखान्यातल्या सोयीसुविधान बाबत रूग्णाचे योग्य प्रकारे उपचार लसीकरण ,अँटीजेन्टन टेस्ट, रुग्णवाहिका यावर चर्चा करण्यात आली डॉ. प्रज्ञा वंजारी आरोग्य अधिकारी यांना रुग्णांना योग्यप्रकारे ट्रीटमेंट देऊन चांगल्या एकदम हस्ताखलिच्या परस्थितीत असलेली रुग्णवाहिका असलेल्या मुळे एक चागल्या प्रकारची रुग्णवाहिकेची प्रशासणा कडे मागणी करण्यास सांगितले आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देते वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा उपप्रमुख मंगलभाऊ सोनटक्के, सेलू तालुका प्रमुख हंसराज बेलखोडे, सिंधी रेल्वे शहर प्रमुख सुरज आष्टनकर, सिंधी रेल्वे उपशहर प्रमुख सचिन पेटकर, प्रहार शेतकरी संघटना शहर प्रमुख नूतन बेलखोडे, प्रहार शेतकरी संघटना उपशहर प्रमुख शुभम सुरकार ,प्रहार विद्यार्थी संघटना शहर प्रमुख अभिषेक बडवाईक, प्रहार विद्यार्थी संघटना उपशहर प्रमुख कुणाल सोनटक्के, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.