विदर्भात उन्हाचा पारा झपाट्याने वाढला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद
राजुरा, विरेंद्र पुणेकर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यासोबत विदर्भात आता उन्हाचा तडाखा वाढत आहे. विदर्भातील चंद्रपूरचे तापमान 44.1 अंशावर, तर राजुरा, सास्ती कोळस्याच्या खाणी असल्या मुळे तापमान सर्वाधिक 45.9 वर पोहोचले आहे.
गेल्या आठवड्यात विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे व कोळस्याच्या खाणी संलग्न असणाऱ्या गावात तापमान वाढत आहे. पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोरोनामुळे जनता संकटात सापडली आहे. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. अशामध्येच आता तापमान वाढत असल्याने गरमी होत आहे. त्यामुळे लोकांना शीतपेयही मिळत नाही. कोरोनामुळे उन्हापासून थंडावा देणारी शीतपेयाची दुकानं बंद आहेत. उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी लोकं लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, आईस्क्रिम, लस्सी, टरबूजकडे नागरिकांचा कल वाढला आहे.