रोहिणी आयोग विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी उपयोगाचे काय? एक ऑनलाइन परिसंवाद संपन्न
चंद्रपूर, २१ एप्रिल : अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली व महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नागपूर चे विद्यमाने आयोजित ऑनलाईन परिसंवाद कार्यक्रमात रवींद्र कुमार दिल्ली अखिल भारतीय घुमांतू जनजाती वेलफेअर संघ दिल्ली यांचे अध्यक्षतेखली तसेच बालक राम सांशी हरियाणा, अमरसिंग भेडकुट पंजाब, राष्ट्रिय महासचिव, अखिल भारती घुमंतु जनजाती वेलफेअर संघ दिल्ली, हरिभाऊ राठोड राष्ट्रीय नेते डी. एन. टी. व. ओ बी सी समाज, आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय घुमांतु जनजाती वेलफेअर संघ दिल्ली, डॉक्टर रानु छारी राष्ट्रिय महिला अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त घुमंतू वेलफेअर संघ दिल्ली, नामा जाधव (बंजारा) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, डी. सी. राठोड महाराष्ट्र प्रदेश महासचिव, चंद्रशेखर कोटेवार विदर्भ संघटक व डॉक्टर राजू ताटेवार विदर्भ सहसांघटक, मुकुंद आडेवर संघर्ष वाहिनी नागपूर, दिपक नागपुरे, अर्चनाताई कोटेवार, नागपूर जिल्हा प्रमुख व परिसंवाद आयोजन प्रमुख इत्यादीचे प्रमुख ऑनलाईन उपस्थितीत व विमुक्त जाती भटक्या जमाती सह ओबीसी प्रवर्गातील विविध जाती, जमाती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते यांचे शेकडोंच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या ऑनलाईन परिसंवादातून रोहिणी आयोगाचे द्वारे (ओबीसी प्रवर्गात विभाजन करून ए बी सी डी प्रवर्गात विभाजन) प्रस्तावित शिफारशी विमुक्त भटक्यांना फायद्याचे राहून सवैधानिक दृष्ट्या सिद्ध होईल का? या विषयसंदर्भात ऑनलाईन परिसंवादातून डी. राठोड यांनी आपले प्रस्तविकेतून रोहिणी आयोगाचे उद्देश व कार्यप्रणाली बाबत माहिती दिली. यानंतर आपले प्रमुख उपस्थिती भाषणातून आनंदराव अंगलवार यांनी रोहिणी आयोगाचे उद्देश व क्राईटरिया बाबत बोलताना ते म्हणाले की ओबीसी प्रवर्गातील विकसित ओबीसी व मागासलेले ओबीसी म्हणजे विमुक्त, भटक्या जमाती व बारा बलुतेदार (आर्टीजन, कलाकार,कारागीर समाज) यात विकासासाठी विभाजन करून ओबीसी प्रवर्गातील अती मागास समाजाचे विकास साधण्यासाठी रोहिनी आयोग भारत सरकार योग्य राहील काय? या विषयावर चर्चा करताना विमुक्त भटक्या समाजाचे विकासासाठी गठित राष्ट्रीय स्तरावरील रेणके आयोग, दादा ईदाते आयोगाने शासनाकडे केलेल्या शिफारशीची दखल घेतल्याशिवाय रोहीनी आयागाचे शिफारशी लागू करणे हे अती मागास विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांवर अन्याय होईल असे दिसून येताच सर्व उपस्थित विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे दिसून आले. जर रोहिणी आयोगाचे प्रस्तावित/ड्राफ्टींग शिफारशी सरकारने लगेच स्विकारले तर विमुक्त भटक्या (राष्ट्रीय पातळीवर D.N.T.) समाजावरील अन्याय टाळण्यासाठी रेनके आयोग व दादा ईदाते आयोगाचे काळात अभ्यास दौऱ्यात जे अति मागासलेले विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील उपजाती/तत्सम जमाती ज्या जमाती भारताचे स्वातंत्र्य प्राप्त काळापासून ७५ वर्ष लोटूनही या जमातींचे भारत सरकारचे जाती निहाय यादित कुठेही नोंद नाही अशा जातींना रोहीणी आयोगाचे शिफारशी पासून नुकसान न होण्यासाठी विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील अशा जमाती संघटनांनी आपले समाजाचे राष्ट्रीय ओबीसी प्रवर्गात नोंद करवून घेण्यासाठी त्या त्या राज्यातील राज्य सरकारद्वारे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून घेतला पाहिजे. तेव्हाच रोहिनी आयोगाचे फायदे विमुक्त भटक्या जमातींचे दुर्लक्षित उपजाती/तत्सम जमातींना होईल. अन्यथा त्या उपजाती पुन्हा शासनाचे विकासात्मक योजनांपासून दूर फेकल्या जाण्याची भीती आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर उत्तर देताना हरिभाऊ राठोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून सर्व उपस्थितांचे प्रश्नांना स्पष्टीकरण सह उत्तर देऊन विमुक्त भटक्या जमाती तील भावी पिढसाठी रोहिणी आयोग अत्यंत फायदेशीर राहील. जर सदर आयोगाचे उद्देशाने काम झाले नाहीतर विमुक्त भटक्या जमातीच्या लोकांचे खूप नुकसान होईल. असे प्रतिपादन करून रोहिणी आयोग लागू करून घेणेसाठी ओबीसी प्रवर्गातील विमुक्त भटक्या जमाती सह बारा बलूतेदार समाज व समस्त अती मागासलेले ओबीसी एकसंघ होऊन शासन दरबारी लढा देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. बालक राम सांशि, अमरसिंग भेडकुट, डॉक्टर राणू छारी, मुकुंद आडेवार, महेश भाट, श्री मानकर, हिरामण चव्हाण मंगल सिंह सोलंकी सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजित परिसंवादाचे विषया संदर्भात व रेनके आयोग तसेच दादा ईदाते आयोग बाबत सविस्तर चर्चा दरम्यान विविध प्रश्न उपस्थित केले. तेव्हा हरिभाऊ राठोड यांनी अापले प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सविस्तर उत्तर देऊन समाजाला एकसंघ राहण्याचे आवाहन केले. लगेच कोरोना काळ संपल्यानंतर रोहिणी आयोगातील मान्यवर सदस्य व अध्यक्ष सोबत बैठक लावून सदर आयोगाला आपल्या समस्येबाबत एका शिष्ट मंडळाद्वारे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्याचे नियोजन संगीतले. तर रवींद्र कुमार सिंह यांनीही आपले अध्यक्षीय भाषणातून रोहिणी आयोगाला भेटून ओबीसी प्रवर्गातील अती मागास विमुक्त भटक्या प्रवर्गतील विविध समाजाचा उल्लेख करून त्यांचे संदर्भात पाठपुरावा आपल्या संघटनेद्वारे करून रोहिणी आयोगाला समस्या बाबत निवेदन सादर करून प्रश्न आयोगासमोर मांडण्यासाठी वचन दिले. यापुढे समस्त समाज बांधवांनी एकसंघ राहावे. शासनाला आपली ताकद दाखवावे असे या प्रसंगी आवाहन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्र संचलन डॉक्टर राजू ताटेवार व आभार प्रदर्शन दिपक नागपुरे नागपूर जिल्हा प्रमुख यांनी केले. याप्रसंगी शंभराच्या जवळपास सामाजिक कार्यकर्ते ऑनलाईन परिसंवादात सहभागी झाले होते.