पुन्हा एकदा गाव बंदी मोहीम
राजुरा (बाबापुर) विरेंद्र पुणेकर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटीने राज्यात धुमाकूळ घातला आहे.
वाढत्या कोरोना बधितांनी संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच कोरोना बधितांनी रुग्णालयात बेड, प्राणवायू व औषधा चा तुटवळा होत असल्याने नागरिकांना मधी कोरोना संसर्गाची भीती मोट्या प्रमाणात वाढली आहे.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बाबापूर वासीयांनी गाव बंदी मोहीम आखली आहे.
लगेच च्या गावातील कोरोना संक्रमित्यांची वाढती संख्या पाहता तसेच गौरी, पौवनी, साखरी, पेल्लोरा, मथरा ह्या गावातील संक्रमित रुग्णांना पाहता बाबापूर वासीयांनि बाहेरील गावकरियांना गावात प्रवेश निषेध केला आहे.
जेने करून कोरोना संसर्गाला आळा बसेल व गावात कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होणार नाही ह्या ध्येया पोटी गाव बंदि मोहीम आखण्यात आली
संलग्नित असलेल्या गौरी, पौवनी गावात मागील काही दिवसात ७० हुन जास्ती कोरोना संक्रमित वेक्तींची नोंद झाल्या मुडे बाबापूर, माणोली, काढोली, चार्ली, नीर्ली, कोलगाव वासीयांन मधी भीतीचे वातावरण पसरले आहे.