भाजपा कडून हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयाला चार पोर्टेबल वेंटीलेटर (एन.आय.व्ही) भेट
हिंगणघाट, अनंता वायसे : केंद्रीय दळनवळन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे प्रयत्नातुन प्राप्त झालेले चार पोर्टेबल वेंटीलेटर आ. समीरभाऊ कुणावार यांचे कार्यालयातून हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयाला हस्तातंरीत करण्यात आले. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन सर्वत्र थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्नसंख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे रुग्नालयावरिल ताण वाढत आहे. वैद्यकीय उपकरणांची निकड भासत आहे. ऑक्सीजन व वेंटिलेटर च्या अभावी रुग्णाचे हाल होत असुन अनेकांचा मृत्यु होत आहे. ही बाब द्यानात घेत केंद्रीय दळनवळन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांनी विदर्भात विविध रुग्णालयात वेंटीलेटर उपलब्ध करून दिले. त्या अंतर्गत हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयाला चार पोर्टेबल वेंटीलेटर (एन.आय. व्ही) देण्यात आले. आ. समीरभाऊ कुणावार यांचे कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ चाचारकर यांना चार वेंटीलेटर हस्तातंरित करण्यात आले. यावेळी खासदार रामदासजी तड़स, आमदार समीरभाऊ कुणावार, भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीषजी गोडे, भाजपा महामंत्री किशोरजी दिघे, माज़ी जि. प. अध्यक्ष नितीनभाऊ मडावी, म.रेल्वे सल्लागार समिती सदश्य प्रा. किरणजी वैद्य यांची उपस्तीती होती.
हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयाला चार वेंटीलेटर प्राप्त झाल्याने गंभीर रुग्नाणा दिलासा मिळणार आहे असे सांगून आमदार समीरभाऊ कुणावार यांनी ना. नितिनजी गडकरी यांचे आभार मानले.