साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी निमित्ताने गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार
अमोल राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय वरोरा येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दी दिना निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विलासराव नेरकर अध्यक्ष विधानसभा क्षेत्र वरोरा . चंद्रकांत कुंभारे तालूकाध्यक्ष ओबीसी सेल ,यांनी महापुरुषांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले .तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षेत लोकमान्य कन्या विद्यालय वरोरा येथील कु.मृणाल उमेश लाभे विद्यार्थीनिने ९८.६०% गुणप्राप्त करुन चंद्रपुर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक घेऊन वरोरा तालूक्याचा शैक्षणिक लौकिक वाढवीला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरोराच्या वतीने गुणवंत विद्यार्थीनीच्या घरी जाऊन तिला गुणगौरवपञ देऊन गौरविताना आई वडील व गुरुजनांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस तथा उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी विलासराव नेरकर ,चंद्रकांत कुंभारे ,बंडूजी डाखरे ,राजेंद्र वरघने ,दिनेश मोहारे ,विजय धंदरे ,योगेश लोहकरे अशोकजी सोनटक्के दिलीप खैरे. सुनिता नरडे फारुख शहा उपस्थित होते.