आरोग्य उपकेंद्र भोयगाव येथे कोरोना लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद
भोयगाव आरोग्य उपकेंद्रात 103 च्या वरती नागरिकांना कोरोनाचे लसीकरण देण्यात आले. भारोसा ग्रामपंचायत ची ग्रामसेविका सौ. सुनीता राजपूत मॅडम तसेच भारोसा चे सरपंच तथा इतर मेंबर यांनी सुद्धा लसीकरण घेतले.
नागरिकांनी न घाबरता लसीकरण घ्यावे
वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे त्या सोबत समुदाय आरोग्य अधिकारी मेघा कोरडे, आरोग्य सेविका शारदा गेडाम, आशा गटप्रर्वतर कल्पना ताजने, आशा वर्कर शालू आत्राम, गीता पानघाटे आरोग्य सेवक दीघोरे, वाघमारे डाटा ऑपरेटर सचिन पाचभाई यांनी याकामी जनतेत जागृती करून लसीकरणाची अमलबजावणी करत आहेत. नागरिकांनी न घाबरता लस घेण्याचे सांगितले आहे.
लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा
चंद्रपूर जिल्ह्यातील कवठाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोयगाव उपकेंद्रा कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.आत्तापर्यंत जवळपास 103 च्या वरती नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.बावणे यांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्तम कार्य कोरोना लसीकरणाचे सुरू आहे.४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे.
यासाठी या आरोग्य उपकेंद्रात यंत्रणा हे अतिशय उत्तम कार्य करीत आहे.त्यामुळेच कोरोनाच्या लसीकरण सुरवातीला पहिल्या दिवशी 100 च्या वरती नागरिकांना लस देण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी न घाबरता कोरोनाचे लसीकरण घ्यावे व लसीकरण केल्याने कोणतीही प्रकृतीसंदर्भात कोणतीही समस्या उद्भवणार नाही.तसेच नागरिकांनी सोबत येताना आधार कार्ड व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणावे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.बावणे यांनी केले आहे.
तसेच कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरीता
नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करावे. समाजात लसीकरणाबाबत जनजागृती करावी व सर्वगावातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या लसीकरणाचा लाभ घ्यावा.