प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हरभरा या पिकाचे नाफेड ने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व प्रति क्विंटल 300 रुपये बोनस मिळण्या करिता जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनातुन मागणी
अनंता वायसे । प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख रुग्णमित्र मा.गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली व वर्धा जिल्हा प्रमुख मा.जयंतभाऊ तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जिल्हाधिकारी मॅडम वर्धा मार्फत मा. तहसीलदार साहेब सेलू यांना निवेदन देण्यात आले की नाफेड (द विदर्भ को ऑ. मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूर) या एजन्सी मार्फत सिंधी रेल्वे या केंद्रावर हरभरा या पिकाची हमी भावानुसार रुपये 5100 प्रति क्विंटल या भावाने एका महिन्यापूर्वी खरेदी केली पण आज एक महिना लोटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही याआधी शेतकरी मेटाकुटीला आला आहे कारण सोयाबीन हे पीक खोड किड्या मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव असल्यामुळे या पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले कसे तरी हरभरा हे पीक उत्पन्न बरे राहिले तर एक महिना होऊन सुद्धा शेतकऱ्यांना चुकरा मिळत नाही, शेतकऱ्यांना पिक कर्ज भरायची आहे व कृषी केंद्र दुकानदाराची उधारी द्यायची आहे ते कसे देणार ही गंभीर समस्या शेतकऱ्यांन समोर आहे.
सध्याच्या परिस्थितीत हरभरा या पिकाचे बाजार भाव हमीभावापेक्षा पुढे गेले आहे सध्या 5400 रुपये प्रति क्विंटल असा भाव कृषी उत्पन्न बाजार समिती मिळत आहे आणि नाफेड ने 5100 रुपये प्रति क्विंटल ने खरेदी केला क्विंटल मागे 300 रुपये नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे तरी प्रती क्विंटल मागे 300 रुपये बोनस देण्यात यावा अश्या दोन मागण्या करण्यात आल्या आहे. निवेदन देते वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा उपप्रमुख मंगलभाऊ सोनटक्के , सेलू तालुका प्रमुख हंसराज बेलखोडे ,सिंधी रेल्वे शहर प्रमुख सुरज आष्टनकर, सिंधी रेल्वे उपशहर प्रमुख सचिन पेटकर, शेतकरी संघटना शहर प्रमुख नूतन बेलखोडे, उपशहरप्रमुख शुभम सुरकार व शेतकरी प्रकाशराव शेंडे, कैलासराव आष्टनकर, मारुतीची बेलखोडे, संजय बोंगाडे ,रवींद्र रेवतकर, रमेशराव बेलखोडे, वासुदेवराव सुरकार आदी शेतकरी उपस्थित होते.