स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिलांनी लावले राखी विक्रीचे स्टॉल
पोंभुर्णा:- उमेद- अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण करणे व महिलांना उद्योजकीय धडे देऊन त्यांना स्व बळावर विविध व्यवसायाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करणे या उद्देशाने तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर अंतर्गत महिलांना मार्गदर्शन करण्यात येते आहे. त्यातूनच बहीण व भाऊ यांच्या नात्याला एकत्रित घट्ट बंधनांचा असा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. याचे औचित्य साधून महिलांनी राखी विक्रीचे स्टॉल तालुक्यातिला मुख्य बाजारपेठेत लावले. यातून महिला पुढे एकत्रित येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरवात करावेत व हे छोटेसे लावण्यात आलेले स्टॉल भविष्यात इतर महिलांना प्रेरणादायी ठरेल व वेगवेगळ्या सणानुसार प्रत्येक महिलांनी विक्रीचे स्टॉल लावावेत अशी अपेक्षा श्री. राजेश दुधे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी व्यक्त केली. सदरचे राखी विक्रीचे स्टॉल लावण्याबाबत मार्गदर्शन कु.स्मिता आडे BC-FL, भावना देवगडे उद्योग सखी यांनी सहकार्य केले.