अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या प्रसिध्द कवयित्री कु. अर्चना सुतार
काव्यरचनेच्या माध्यमांतुन केली त्यांनी काेराेना महासंकटात जनजागृती
पाचवड, किरण घाटे : काेराेना महासंकटात स्वयंरचित काव्यरचनेच्या माध्यमांतुन जनजाग्रूतीचे महान कार्य करणा-या पाचवडच्या प्रसिध्द कवयित्रि कु.अर्चना दिलीप सुतार अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहे .त्यांनी आज पावेताे जनजाग्रूती करण्यांकरीता एक दाेन नव्हे तरं काेराेना काळात शंभर पेक्षा अधिक कविता शब्दांकित करुन त्या विविध माध्यमांतुन प्रसारीत केल्या आहे.
महाराष्ट्रातील नामवंत काव्यकुंजच्या त्या एक जेष्ठ सदस्या आहे. कु. सुतार यांनी आपल्या गावाचेच नाही तर जिल्ह्याचे राज्याचे व देशाचे नाव जगाच्या नकाशावर (गुगल वर) आणले आहे . महाराष्ट्रातच फक्त त्यांचे नाव नसून भारतातल्या प्रत्येक राज्यात त्याही पलीकडे श्रीलंका मलेशिया देशांसारख्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या 193 देशांत त्यांचे नाव झाले आहे.
या शिवाय कवयित्रि अर्चना सुतार यांचे नाव रेकॉर्ड बुक मध्येही नाेंद झाले आहे. इयत्ता आठवी पासून कविता लिहिण्यांचा त्यांचा प्रवास आरंभ झाला .हायस्कूलला कॉलेजला बीएडला असताना त्यांच्या कविता वार्षिकांत येत होत्या. त्याचीच स्फूर्ती घेऊन कविता लिहिण्याचा छंद त्यांनी सुरु ठेवला आहे . हायस्कूल इंग्रजी विषयाच्या माध्यमिक शिक्षिका असल्याने इंग्रजीतही कविता त्या लिहू लागल्या.
कु .सुतार यांच्या कविता दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, आकाशवाणी, युट्युब तसेच टीव्ही चॅनेलवर अधुन मधून प्रसारीत होत असतात.त्यांच्या शब्दांकित केलेल्या अनेक विषयावरील कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत.या व्यतिरीक्त अनेक कवी संमेलनात त्यांनी भाग घेतला आहे . 91 व्या भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या निमंत्रित कवयित्री आहेत. कोरोनाचे जगावर संकट कोसळले असतानाच जनजागृती करण्याचे त्यांनी जगभरात महान कार्य केले आहे. इतकेच नाहीतर त्यांनी कोरोनावर शंभर कविता लिहून उच्चांक केल्याने त्यांचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांनी भारतातील सर्व राज्यांनी परदेशातील मिळून तब्बल 125 पुरस्कार त्यांना दिले गेले आहेत. भुसावळवरुन “कर्मवीर”, यवतमाळ वरून “आंतरराष्ट्रीय नारीरत्न”, आंध्रप्रदेश वरून “ए.पी.जे. अब्दुल कलाम” राष्ट्रीय पुरस्कार,तमिळनाडू वरून “जंटल वुमन” राष्ट्रीय पुरस्कार, तसेच श्रीलंका देशाहून “जिवनंदा अॅप्रिसिएशन फोर नोबेल वर्क” आणि “इंटरनॅशनल महात्मा गांधी आयकॉन अवार्ड 2020” हे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्त “हिस्टॉरिकल मेमोरियस अवर्ड 2020″हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे मलेशिया देशाहून “जागतिक कोविंड योद्धा” म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवले आहे.हे येथे विशेष उल्लेखनिय आहे.
आज याच जागतिक पुरस्कार विजेता कवयित्रिचा आज वाढदिवस या निमित्ताने सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे , सहजं सुचलंच्या मुख्य संयाेजिका सुविधा बांबाेडे , अल्का सदावर्ते , सराेज हिवरे , सहसंयाेजिका प्रतिभा चट्टे ,श्रुति कांबळे , कु. सायली टाेपकर तसेच रजनी रनदिवे , श्रूति उरणकर , गीताताई बाेरडकर , विजया भांगे , विजया तत्वादी , स्मिता बांडगे , प्रतिभा नंदेश्वर , अर्जुमन शेख , सिमा पाटील , छबुताई वैरागडे , सुवर्णा कुळमेथे , कविता चाफले , साधना वाघमारे , मंथना नन्नावरे , प्रदन्या भगत , वर्षा शेंडे , माया नन्नावरे , ज्योति मेहरकुरे , सुवर्णा लाेखंडे , रसिका ढाेणे ,पायल आमटे , भारती मैदपवार , उज्वला यमावार , संजिवनी धांडे , मंजूषा दरवरे , सुविधा चांदेकर , प्रतिक्षा झाडे , शारदा झाडे , कांचन मुन ,कल्याणी सराेदे , वर्षा ढवस व शारदा मेश्राम यांनी अर्चना सुतारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.