अमोलकचंद विधी महाविद्यालयात प्रेरण उपक्रम
प्रतिनिधी । विद्या प्रसारक मंडळ संचालीत अमोलकचंद विधी महाविद्यालयात एल एल.बी. तिन व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरण उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने घेण्यात आला. यावेळी मुख्य वक्ता म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सी.ए. प्रकाश चोपडा उपस्थित होते तर प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार ह्या अध्यक्ष स्थानी होत्या. यावेळी आयक्युएसी चे समन्वयक डॉ. संदीप नगराळे आणि कार्यक्रम समन्वयक डॉ.विजेश मुणोत उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करतांना श्री चोपडा म्हणाले कि, डॉ. आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा विधी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्वत्तेपासून प्रेरणा घ्यावी . पुढे ते म्हणाले कि जिवणांत यशस्वी व्हायचे असेल तर आपण चांगल्या लोकांच्या संपर्कात असायला पाहिजे. वकिली क्षेत्र हे सर्वात जास्त कमाई असणारा व्यवसाय आहे पण त्यासाठी तेवढीच जास्त मेहणत घ्यायची गरज आहे. तसेच नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची माहिती दिली व समयोजीत मार्गदर्शन केले .
यावेळी डॉ. विजेश मुणोत यांनी क्षेत्रातील संधीबाबत मार्गदर्शन केले.तसेच डॉ. संदीप नगराळे यांनी उच्च शिक्षणाचे जिवणात महत्व तसेच ताण व्यवस्थापन यावर भाष्य केले.
श्री अजय दर्डा तसेच श्री मनोज गौरखेडे यांनी ही परीक्षा ,शिष्यवृत्ती तसेच ईतर संबंधित बाबींवर प्रकाश टाकला.
दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात प्रा. वैशाली फाळे, प्रा. छाया पोटे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. स्वप्नील सगणे , प्रा. वंदना पसारी तसेच माजी विद्यार्थी अॕडव्होकेट रंजीत अघमे आणि वरीष्ठ विद्यार्थी निखिल सायरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
नविन प्रवेशित विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.