सेवानिवृत्त डॉक्टर व नर्सेस यांची कंत्राटी पध्दतीवर तात्काळ नियुक्ती करा – आ. किशोर जोरगेवार
कोरोना संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्या जिल्हाधिकारी यांना विविध सुचना
चंद्रपूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या दुस-या लाटीमूळे आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होतांना दिसून येत आहे. त्यामूळे कोरोनाच्या संकटाशी लढण्याकरीता आरोग्य व्यवस्था बळकट करणे गरजेचे असून अनेक सेवानिवृत्त डॉक्टर व नर्सेस या कठीण काळात सेवा देण्यासाठी इच्छूक आहेत. अशात सदर डॉक्टर व नर्सेसला तात्काळ कंत्राटी पध्दतीवर नियुक्त करण्यात यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे.
चंद्रपूरात कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर पोहचला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमूळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला असून रुग्णांची गैरसोय होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करुन आपसात योग्य समन्वय ठेवण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. तसेच खाजगी व शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड ची कमतरता आहे त्यामुळे सद्यस्थितीत हाई फ्लो ऑक्सीजन बेड संख्या वाढविण्यात यावी, खाजगी रुग्णालयातील बेड ची कमतरता बघता रुग्ण संख्येच्या तुलनेत त्यांच्या रुग्णालयाची क्षमता १० टक्कांनी वाढविण्यात यावी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाहीकांसाठी दिशादर्शक तसेच रुग्णाची प्रकृती व आजारावरील उपचाराकरिता योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी माहिती व मदत केंद्राची स्थापना करण्यात यावे, सेवानिवृत्त डॉक्टर्स व सेवानिवृत्त नर्सेसला अग्रिम मानधन देवून कंत्राटी पध्दतीने तात्काळ नियुक्ती करण्यात यावी., चंद्रपूर जिल्हातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा दर लक्षात घेता रुग्ण संख्येच्या तुलनेत बेड उपलब्ध करण्याकरिता आयएमएच्या तज्ञ सदस्यांबरोबर चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्यात यावे, आरटीपीसीआर तपासणी संदर्भातील संदेश वेळेवर पोहचत नाही, त्याकरिता तांत्रिक अडचण दूर करून सदर संदेश सुलभ भाषेत तात्काळ रुग्णांपर्यंत पोहचेल याची व्यवस्था करावी., कोविड रुग्णालया करिता स्वयंस्फूर्तीने येणाऱ्या खाजगी रुग्णालयांना नियमानुसार अटी व शर्तीसह कोविड रुग्णालय सुरु करण्याकरिता तात्काळ मंजुरी देण्यात यावी. आदि सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहे.