सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका पोंभुर्णा व ग्रामपंचायत चेकफुटाना यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताचे औचित्य साधून
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने तो तुटवडा भरून काढण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकार्यांनी घेतला पुढाकार
पोंभुर्णा प्रतिनिधी :- महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताचे सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका पोंभुर्णा व ग्रामपंचायत चेकफुटाना यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सभागृह चकफुटाना येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले . कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असुन रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. तो तुटवडा भरून काढण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी पुढे सरसावून व कोविड-19 च्या सूचनांचे पालन करुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व त्याला पोंभूर्णा तालुक्यातील सर्व जनतेचा भरपुर प्रतिसाद मिळाला .कार्यक्रमाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुका पोंभूर्णा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य लोकेश झाडे ,महासचिव भावेश दुर्योधन, सचिव देवा चंदावार, उपाध्यक्ष ईश्वर अर्जूनकर ,उदय बोबडे, आदेश तेलसे, अंकुश चांदेकर, मुख्यासंघटक गणेश अर्जूनकर, संघटक दत्तुभाऊ बोबडे, प्रसिद्धी प्रमुख वासुदेव बोबडे , विनोद अर्जूनकर, आतिश तेलंगे, राजू चंदावार, निकेश अर्जूनकर, बीअभिषेक अर्जूनकर, तथा ग्रामपंचायत कार्यालय चकफुटाणा सरपंच जयश्री अर्जूनकर, उपसरपंच ईश्वर पिंपळकर, सदस्य गणेश अर्जूनकर, लोकेश झाडे, अनुराधा गौरकर, विद्या कलसार, मंगला कुबडे, प्रमुख अतिथी उपस्थिती ओ कवडू कुंदावार अध्यक्ष काँग्रेस तालुका पोंभूर्णा, साईनाथ शिंदे अध्यक्ष राजीव गांधी निराधार पोंभूर्णा, रवीभाऊ तेलसे महासचिव वंचीत बहुजन आघाडी तालुका पोंभूर्णा, विशेष अतिथी श्रीकृष्ण अर्जूनकर, नंदुभाऊ चांदेकर, विलास रामगिरकर, रमेश कुबडे रोजगार सेवक, ग्रामपंचायत दिघोरी उपसरपंच शंकर वाकुडकर, सदस्य सूरज कुंभारे, ग्रामपंचायत नवेगाव मोरे सरपंच जगदीश शेमले, पंकज वड्डेटीवार वेळवा, प्रशिक मानके सेल्लुर, डॉ. गावीत साहेब रक्त संकलन चंद्रपूर.व चक फुटाणा येथील समस्थ गावकरी मंडळी उपस्थीत होते.व कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण रक्त दात्यांचे मनपूर्वक आभार आभार मानून आणि प्रमाणपत्र वितरण करून करण्यात आला.