चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात पसरली घाण, वरिष्ठांचे दुर्लक्ष!

0
779

चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात पसरली घाण, वरिष्ठांचे दुर्लक्ष!

चंद्रपूर,किरण घाटे । काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा सामान्य रुग्णालयात इत्तर रुग्णांची होत असलेली गैरसोय बघण्याकरिता गेलेल्या आम आदमीच्या शिष्टमंडळाला चक्क जिल्हा रुग्णालय घाणीच्या साम्राज्यात असल्याचं प्रत्यक्षात आज दिसलं.
रुग्णालय परिसरातील घाण पाणी वाहून नेणा-या नालीवरील चेंबर फुटल्याने संपूर्ण घाण पाणी स्त्री प्रसूती व बाळ रुग्ण विभाग परिसरात मागील ६ दिवसापासून साचलेलं आहे त्यामुळे तेथे डेंग्यू, चिकन गुणिया, टॉयफाईड, मलेरिया, फायलेरिया चे जंतू पनपण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कुठेही सुरक्षा रक्षक,सफाई कामगार आढळले नाहीत. शहरात एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालय असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आहे.
परंतु या रुग्णाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.स्त्री प्रसूती व बालरुग्ण विभागाच्याच बाजूला वापरलेल्या पीपीई किट कचऱ्यात फेकलेल्या आढळलेल्या आहेत. तसेच शवविच्छेदन परिसरात मुलींचे वसतिगृह आहे त्यालाच लागून कोव्हीड-१९ लसीकरण कार्यक्रम सुरू दिसला. तेथेच १० मीटर अंतरावर घाण कचरा, हाईजिनिक कचरासोबत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे. गोरगरीब जनतेकरिता असलेले हे रुग्णालय आज जणू घाणीचे साम्राज्यात दिसत आहे.
याबाबत आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांना भेटणार असून लवकरच आरोग्य व्यवस्थेची दिशा आणि दशा युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याची मागणी त्यांचेकडे करणार आहे. जर युद्धपातळीवर व्यवस्था सुदृढ न झाल्यास चंद्रपूरकर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल… याला जिम्मेदार शासन प्रशासन व आमदार व खासदार राहतील. रुग्णालय भेटीच्या वेळी आप चंद्रपुर चे संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर सचिव राजू कुडे यांनी केले. यावेळेला पक्षाचे सहसचिव अजय डुकरे, महिला आघाडी श्रीमती देवीकताई देशकर, राजेश चेडगूलवर, सिकंदर सांगोरे, दिलीप तेलंग, बबन कृष्णपल्लीवार, राजेश विराणी, मधुकरराव साखरकर, वामनराव नांदूरकर,अव्हेज शेख, शाहरूख शेख, अशोक आनंदे, सुखदेव दारुनडे, अंमजद भाई, प्रशांत येरने आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here