आढावा!
नागपूर🟧🟩किरण घाटे🟪🟨वैदर्भिय लोकप्रिय कवयित्रि तथा महाराष्ट्रात प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या सहजं सुचलं काव्यकुंज व्यासपीठाच्या मार्गदर्शिका गीता बाेरडकर यांनी शब्दांकित केलेली आढावा ही काव्य रचना खास आम्ही वाचकांसाठी देत आहाे ! 🟧🟨🟪आढावा 🟦🟥🟩
🌼🟨आज एकांतात हळूच घ्यावा म्हटलं
आयुष्याच्या चित्रपटातील
काही घटनांचा ओझरता आढावा
अन् करावी गोळा बेरीज
मिळवल्या, गमावल्याची
🟩🟪सांज एव्हाना मावळतीच्या सूर्याच्या
सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाली होती
🟧🟥आणि एकीकडे निळ्याशार आकाशात
एक छोटासा तारा अंधुक चमकत होता
दृश्य अतिशय विलोभनीय होतं
पण…… का कोण जाणे ??
🟩🟦मावळतीच्या सूर्य पाहून मन अस्थिर झालं
मनाची ही कालवा कालव फक्त मलाच
जाणवत होती , घाबरं घुबरं मन
मला काहीतरी सांगत होतं
मी घट्ट डोळे मिटले ,आणि….. एक अनपेक्षित आवाज कानी पडला
🟨🟧” सावर…..तुझ्या आयुष्याची सांज
आता फार दूर नाही”
मी दचकून खाडकन डोळे उघडले.
वर आकाश निरभ्र होतं
पण माझ्या मनातल्या आभाळात मात्र
🟧🟩स्मृतींच्या असंख्य ढगांनी दाटी केली होती
सासरचा उंबरा ओलांडताच
जळत्या स्वप्नांच्या त्या ज्वाला
अंतरंग होरपळू लागल्या
आपुलकी त्यात स्वाहा होऊन
स्वार्थी पणाचा धूर डोळ्याना
झोंबू लागला
🟨🟪अपेक्षित असलेलं ते प्रेम ……
त्याची….त्याची तर केव्हाच राख झाली होती
उरलं होतं ते फक्त कर्तव्याच्या वेदीवर
स्वतःला समर्पित करत जगणं
आणि माझ्या बाईपणाची
पदोपदी होणारी हेळसांड बघणं
🟩🟥कित्येक रात्री एकांतात
अश्रूंनी उशी भिजली,
नव्या संसाराची सोनेरी स्वप्न
रात्रीच्या काळोखातच विझली
🟧🟪रोज रोज अश्रुंचे दोन थेंब
त्या संसाराच्या झालेल्या
राखेवर सांडत होते
नव्हे……पर्यायानं मीच माझ्या
नियतीशी कडकडून भांडत होते
पण……ते ही पुरेसे नव्हतंच
तो धुमसणारा वणवा विझवण्यासाठी.
आणि आज…. माझं मन
शेवटी कानात कुजबुजलंच.
🟪🟨”सावर…..सावर…..सावर…”
आयुष्याची सांज जवळ आलीय…..
ऊठ……….
नव्या उमेदीनं जगायला शिक
तुझी उपेक्षा करणाऱ्याची पर्वा करू नकोस
🟧🟥जगून घे….. मनसोक्त….. मनमुराद….
सांज भरात असेपर्यंत…..
*”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””*🟩🟧🟨🟥🟩 🟪गीता बोरडकर,नागपूर