जिल्हा परिषद उपाध्यक्षा रेखाताई कारेकरांची मासळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट, जाणून घेतल्या रुग्णालयातील समस्या

0
675

जिल्हा परिषद उपाध्यक्षा रेखाताई कारेकरांची मासळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट, जाणून घेतल्या रुग्णालयातील समस्या

चिमूर(चंद्रपूर)🟥किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिवसागणिंक कोरोना रुग्ण वाढत असल्याने तालुका आरोग्य प्रशासनाने जागरूक राहून जनतेला सदैव सेवा देण्यासाठी तत्पर राहण्याच्या सुचना चंद्रपूर जिल्हा परिषद उपाध्यक्षा रेखाताई कारेकर यांनी दिल्या .प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण बाबत संपूर्ण माहिती त्यांनी भेटी अंती जाणून घेतली.
जिल्हा परिषद उपाध्यक्षा रेखाताई कारेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकारी यांचे साेबत सविस्तर चर्चा करुन कोरोना लसीकरण बाबतची माहिती त्यांचे कडुन घेतली.तदवतचं आरोग्य केंद्राच्याही समस्या त्यांनी जाणून घेतल्या.
या भेटीच्या वेळी ग्राम पंचायत कोलाराचे उपसरपंच सचिन डाहूले,अरुण सालेकर आदित्य कारेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here