वढोलीसह पाच गावांचा पाणी पुरवठा बंद
ठेकेदाराचे दुर्लक्ष ; कार्यवाहीची मागणी
गोंडपिपरी(सूरज माडूरवार)
वढोली येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मागिल सात दिवसापासून बंद आहे.परिणामी या योजनेत समाविष्ट असलेल्या पाच गावांना पाणी टंचाईची झळ बसली आहे.काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने नाल्यातील गढुळ पाण्याने तहान भागविण्याची दुदैवी वेळ गावकऱ्यांवर ओढावली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे.वढोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतुन पाच गावांची तहान भागविल्या जाते. ही योजना ठेकेदार मार्फत चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत वढोली,तारडा,फुरडी हेटी,खराळपेठ,बोरगाव,चेकबोरगाव
या पाच गावांचा समावेश आहे.मात्र मागील सात दिवसांपासून योजना ठप्प आहे.योजनेत आलेला बिघाड दुरस्त करण्याकडे ठेकेदाराचे व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.परिणामी योजनेतील सहा गावांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे.काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नसल्याने नाल्यातील गढुळ पाण्याने गावकरी तहान भागवित आहेत.तालुक्यातील ज्याकविल लाईन ही पोंभुरणा तालूक्यात जोडली असून गोंडपीपरि सर्किट मध्ये जोडावी अशी मागणी केल्या जात आहे.उन्हाळ्याची चाहूल लागली असतांनाच पाणी टंचाईची झळ बसल्याने गावकरी संताप व्यक्त करित आहेत.