शेतकरी आणि ग्राहकांच्या हितासाठी दर बुधवारी भरणार वढोलीत आठवडी बाजार
सक्षम, निसर्ग ग्रामसंघ व ग्रामपंचायत कमिटीचा पुढाकार
गोंडपिपरी(सूरज माडूरवार)
महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान तथा ग्राम पंचायत वढोली च्या पुढाकारातून प्रत्येक बुधवारला वढोलीत आठवडी बाजार भरणार असून नुकतंच संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे यांच्या हस्ते भव्य शुभारंभ करण्यात आला.
वढोलीच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात छोटे खेडे असून वढोलीसह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन बारमाही घेतात.त्या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यासाठी व ग्राहकांच्या हितासाठी निसर्ग,सक्षम ग्रामसंघ व ग्रामपंचायत च्या पुढाकारातून बुधवार दि.३१ ला माता मंदिर च्या मागे बस्थानक जवळ भव्य शुभारंभ करण्यात आला.गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आठवडी बाजार उत्तम माध्यम असून बचत गट व गावाचा विकास साधता येणार गावाची वेगळी ओळख व महिला सक्षमीकरण होणार असे प्रतिपादन संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे यांनी केले.सक्षम,निसर्ग ग्रामसंघ याच्या अंतर्गत गावातील ४८ महिला बचत गट कार्यरत असून महिलांना गावात गृह उद्योगातून निर्माण केलेल्या वस्तू व शेतातील भाजीपाला विकण्याच्या उद्देशाने गावात आठवडी बाजार सुरू करण्यात आले.या शुभारंभ प्रसंगी सरपंच राजेश कवठे, विस्ताराधिकारी शिंदे, उपसरपंच देवाडे, तारड्याचे सरपंच तरुण उमरे, ग्रा.सदस्य संदीप पौरकार,पाणलोट समिती अध्यक्ष सूरज माडूरवार, शा.व्य.स अध्यक्ष संदीप लाटकर, नलुताई कोहपरे, सुरेंद्र मंडपल्लीवर, मुरली आत्राम, शेंडे, रेखाताई नामेवार,अंजनाताई झाडे,वैशाली पौरकार,ग्रामसेवक झिले,मायाताई कुलमेथे ,उमेद अभियानाचे गोरघाटे, प्रकाश रामटेके, किशोर हिंगाने, संतोष वाढई, प्रतीक्षा खोब्रागडे, नवराज चंद्रागडे, समुदाय कृषी व्यवस्थापक गावकरी ,महिला बचत गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.