नाली व रस्त्याची दुरावस्था नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष नालीसफाई करण्याची नागरिकांची मागणी

0
805

नाली व रस्त्याची दुरावस्था नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

नालीसफाई करण्याची नागरिकांची मागणी

राजुरा(चंद्रपूर) : शिवाजी नगर वार्ड क्रमांक ९ येथिल मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाली मध्ये कचराच कचरा जमा झाला असून वारंवार नगरसेवकांना सांगून सुद्धा याकडे कानाडोळा केला जात आहे. या नालीमध्ये कचरा, दारूच्या बाटल्या व पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला असून सांडपाणी वाहण्यास अडचण निर्माण होत आहे. गांभीर्याने याची दखल न घेता नगरसेवकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.
सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना स्वच्छता राखण्याचे निर्देश देण्यात येतात. मात्र नगरपरिषद प्रशासनाचा गाफिलपणा यातून उघड होताना दिसून येत आहे. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त अशी महाराष्ट्रात ख्याती असलेली राजुरा नगर परिषद महाराष्ट्रात प्रथम पारितोषिक मिळते आणि शिवाजी नगर मध्ये त्याचे सर्रास उल्लंघन होतांना दिसून येत आहे. दोन- दोन नगरसेवक असून वॉर्डातील नागरिकांना होणारा नाहक त्रास निदर्शनास आणून सुद्धा त्याकडे कुठलेच गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. साईनगर येथील मुख्य रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
वर्तमान नगरसेवकांना ५ वर्षे काम कुठले आहे, या नगरसेवकांनी कधीच कुठले प्रश्न सोडविले नाही. परत ५ वर्षाने फक्त निवडणुकीला मत मागायला दिसतात आणि पुन्हा तेच ? या चर्चेला नागरिकांमध्ये उधाण आहे. तात्काळ नगरपरिषद प्रशासनाने सदरच्या नालीची सफाई व रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवाजीनगर तसेच साईनगर वॉर्डातील जनतेनी जोर लावून धरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here