गडचांदुरात युवकांनी केली कचरा मुक्त होळी… अभिनव सस्थेचा अभिनव उपक्रम

0
879

गडचांदुरात युवकांनी केली कचरा मुक्त होळी… अभिनव सस्थेचा अभिनव उपक्रम प्रवीण मेश्राम । गड़चांदुरातील अभिनव सामाजिक विकास संस्थच्या सदस्यांनी गडचांदूर नगरीत होळी च्या शुभ मुहूर्तावर वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून कचरा मुक्त होळी असा सामाजिक उपक्रम घेतला. नगरवासीय व अभिनव संस्थेच्या सदस्यांनी वार्डातील सम्पूर्ण काडी कचरा व डिसपॉजरचा प्ल्यास्टिक एकत्र करून जाळले व एक नवा आदर्श समाजापुढे मांडला. या वेळी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी कोणताही ओला कचरा किंवा सुका कचरा इतरत्र न फेकता नगरपरिषद मधील चार चाकी वाहन म्हणजेच कचरा गाडी त्या मध्ये टाकावे. आपल्या घरी दोन पद्धतीचे दसबीन वापरावे किंवा दोन पीपे आपल्या घरी ठेवून रोजचा कचरा रोजच जमा करून त्या घंटा गाडीमध्ये टाकावा. या मुळे आपला गाव शहर हे कचरा मुक्त होईल. या पद्धतीत नागरिकांना जनजागृती करण्यात आली. असा हा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविन्यात आला. या वेळी उपस्थित संस्थेचे सदस्य मयुर एकरे, अतुल गोरे, संतोष महाडोळे, वैभव गोरे, प्रदीप परसुटकर आणि नागरवासीय तुकाराम चिकटे, विजय अँडरस्कार व नगरातील नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here