कोरोना – एक अभिशाप
सिंदेवाही (चंद्रपूर), किरण घाटे । चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या सुपरिचीत कवयित्री भावना खाेब्रागडे यांनी शब्दांकित केलेली ही काव्य रचना ‘काेराेना-एक अभिशाप’ खास वाचकांसाठी देत आहाेत.
मुलीला माझ्या निघाला कोरोना
कुणीही तिच्या जवळ येईना
दहावीचं वर्ष आहे तिचं….
पेपरला सुद्धा तिला वर्गात बसू देईना
तिला सर्दी नाही, ताप नाही, कुठलाही आजार नाही
कोरोना टेस्ट करतांना जराशी घाबरली ती
डोळ्यात आसू नि नाकात पाणी येईलचं ना
पेपरला सुद्धा तिला वर्गात बसू देईना
शेजारीही आता वाळीत टाकल्यासारखे वागतात
समोरून जातांना मान वाकडी करतात
मैत्रिणीही आता तिला समजून घेईना
नि पेपरला सुद्धा तिला वर्गात बसू देईना
तुम्ही म्हणतायं जित्यावरच असावी गोडी
इथे तर जित्यावरच खेळतात अवहलनेची होळी
सांगा कुठे उरलायं माणुसकीचा निशाणा
तिला पेपरला सुद्धा वर्गात बसू देईना
हे प्रशासन आमचं रिकामं बातेबंबाल
एकमेकांची फक्त खेचतात इथे खाल
अपराधावर अपराधाचं पांघरूनच घालतात ना!
आणि तिला पेपरला सुद्धा वर्गात बसू देईना
– भावना खोब्रागडे, सिंदेवाही