मुंबई प्रतिनिधी: महेश कदम
दादर, सेनापती बापट मार्ग येथील कै. प्रमोद महाजन कला पार्क येथे पर्जन्य पाण्याचा साठा करण्यासाठी बनविण्यात येणारे टाकीला नागरीकांचा तिव्र विरोध,
मा. श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांनी घेतली आयुक्तांन बरोबर तातडीची बैठक.
सदर विषया संदर्भानुसार या ठिकाणी महापालिकेकडुन कोणाच्या कामाचा काय स्वरुप आहे याची माहिती फलक लावलेले नाही. या ठिकाणी महापालिकेकडुन बनविण्यात येणारी टाकी ही पर्जन्य टाकी असुन या पर्जन्य टाकीत हिंदमाता-परेल भागात पावसात तुंबणारे पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. तर हिंदमाता-परेल येथील पाणी वाहुन आणण्यासाठी प्रथम परेल एलफिसटन या रेल्वेहद्दीतुन येऊन सदर जलवाहिन्यांचे काम होणे सर्वप्रथम आहे. त्यानंतर या ठिकाणी पाण्याचा साठा करणे शक्य होईल, त्यामुळे या कामाचे नियोजन महापालिकेकडुन होणे गरजेचे असताना याची माहिती देखील नागरिकांना देणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याचे चित्र दिसत आहे. येथे अनेक जाॅगस॔, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला वर्ग रोज व्यायाम करत असतात त्यामुळे कोणते ही मैदान व्यवस्था नसल्यामुळे आमचे तिव्र विरोध आहे. म्हणुन बृहन्मुंबई महानगर पालिका चे आयुक्त श्री. चहल साहेब यांना पत्रक देऊन हे काम थांबवावे असे उल्लेख केले आहे. सदर कामाचा प्रकल्पाला विरोध नाही पण काय व कसे करणार हे महापालिकेकडुन स्पष्ट करावे जेणेकरून नागरिकांन मध्ये संभ्रम रहाणार नाही. तसेच या ठिकाणी जर पर्जन्य टाकी साठा करण्याचे काम करणार असल्यास तर प्रथम हिंदमाता- परेल या भागातून या कामाची सुरुवात करावी व शेवटी कै. प्रमोद महाजन कला पार्क येथे कामाचा शेवट करावा. जेणेकरून लहान मुले व पार्कात येणारे जेष्ठ नागरिक यांना योग्य दिलासा मिळेल. अशी संपूर्ण माहिती वडाळा विधानसभा उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांबळे साहेब यांनी निवेदन पत्रकाद्वारे श्री. चहल साहेब यांना दिले आहे.
तसेच या संदर्भात स्व. प्रमोद महाजन कला पार्क वाचविण्यासाठी तातडीची बैठक
विभागाचे कार्यसम्राट आमदार श्री. कालीदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी/उत्तर विभाग सहाय्यक आयुक्त व एफ- साऊथ विभाग दादर किर्ति महल इमारत येथे उपायुक्त-परीमडळ २ चे अधिकारी मा. श्री. बालमवार साहेब यांच्या दालनात स्व. प्रमोद महाजन कला पार्क येथील महापालिकेकडून नागरिकांची दिशाभूल करून पर्जन्य पाणी साठ्याच्या टाकीचे बांधकाम सुरू केले आहे, सदर काम स्थगीत करून व स्थलांतर करून या कामाकरिता शेजारच्या SWD वर्कशॉप मधील जागेचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी संबंधित अधिकारी वर्गास दर्शवली आहे. ह्या बैठकीत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.