कोरपना व गडचांदूर येथे महाविकास आघाडीचे उपोषण

0
715

कोरपना व गडचांदूर येथे महाविकास आघाडीचे उपोषण

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

कोरपना – आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या तिन काळ्या कृषी कायद्याविरोधात विविध शेतकरी संघटनांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ एक दिवसीय उपोषण आज (दि. २६ ला) कोरपना येथे तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. तर गडचांदूर येथे वीर बाबुराव शेडमाके चौकात करण्यात आले.
केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयक लोकशाही आणि संस्थेचे नियम पायदळी तुडवून संसदेत मंजूर करून घेतले. या कायद्यामुळे शेती, शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. तसेच कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे तिन्ही काळे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध शेतकरी संघटनांनी केंद्र सरकार विरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, नगराध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, महिला शहराध्यक्ष अर्चना आंबेकर, कोरपना तालुका सेवादलाचे अध्यक्ष नोगराज मंगरूळकर, पापय्या पोन्नमवार, कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र ताकसांडे, माजी सरपंच शिवकुमार राठी, हंसराज चौधरी, दादाजी गोरे, धनंजय गोरे, बांधकाम सभापती कल्पना निमजे, विधानसभा यु. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, अनिल सातपुते, गटनेते विक्रम येरणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, बाबाराव पुरके, श्रीकांत धर्मपुरी, शेख अहमद भाई, प्रितम सातपुते, मनोज भोजेकर, विवेक येरणे, रोहित शिंगाडे, आकाश वराठे, रुपेश चुधरी, प्रणय टेकाम, प्रणय ढवळे, विठ्ठल पिदूरकर, केशव डोहे, देविदास मुन, बळीराम ताडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरपना येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, माजी सभापती श्याम रणदिवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, सिताराम कोडापे, माजी उपसभापती संभा कोवे, कोरपना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल बावणे, बाजार समिती कोरपनाचे माजी सभापती भारत चन्ने, नगर परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर चन्ने भाऊराव कारेकर, झिबल जुमनाके, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष इस्माईल शेख, नितीन बावणे, विलास मडावी, मिलिंद ताकसांडे, निसार शेख, जेवराचे उपसरपंच अनिल गोंडे, उपसरपंच रसूल पटेल, भारत गौरी तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here