गोंडपीपरित जागतिक वन दिन निमित्ताने निसर्ग शिक्षण कार्यक्रम साजरा
गोंडपीपरी(सूरज माडूरवार)
स्व.उत्तमराव पाटील वनउद्यान गोंडपिपरी येथे सामाजिक वनीकरण विभाग व राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत शाळा यांच्यातर्फे जागतिक वन दिन व जागतिक जल दिनाचे औचित्य साधून नूकतच निसर्ग शिक्षण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी जंगम, वनरक्षक मत्ते, जनता विद्यालय गोंडपीपरी चे रोडे,ढोक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी जनता विद्यालय गोंडपीपरी व जि. प.शाळा खराळपेठ चे विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व,पर्यावरण रक्षण, प्रदूषण कमी करण्याच्या सवयी, वृक्षारोपण व जंगलांचे महत्व याची माहिती देण्यात आली.
पर्यावरण पूरक होळी साजरी करणेसाठी नैसर्गिक पदार्थ वापरून रंग कसे तयार करायचे याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी दरवर्षी 10 झाडे लावणे व जगवणेबाबत शपथ घेतली.
त्यानंतर विद्यार्थ्यांना उद्यानातील विविध वृक्ष, औषधी वनस्पती ची माहिती देऊन नंतर वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रम संपन्न होणेसाठी वनकर्मचारी राजेश माडूरवार,घुबडे,खरबनकर यांनी अथक परिश्रम घेतले.