गोंडवाना विद्यापीठाच्या समस्यांच्या निवारणार्थ आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे राज्यपालांना साकडे

0
806

गोंडवाना विद्यापीठाच्या समस्यांच्या निवारणार्थ आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे राज्यपालांना साकडे

राजभवन मुंबई येथे घेतली राज्यपालांची भेट

विद्यापीठाच्या बांधकाम तसेच विद्यापीठांतर्गत जमीन अधिग्रहण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ही मांडल्या व्यथा

विद्यापीठाला भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी दिले निवेदन

शेतकऱ्यांना न्याय देण्याची केली विनंती

सुखसागर झाडे । गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या जमीन अधिग्रहण व विद्यापीठाच्या बांधकाम व ईतर समस्यांच्या निवारणार्थ गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. भगतसिंगजी कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली व समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री नगरसेवक प्रमोदजी पिपरे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या ७८.१७ हेक्टर जमिनीचे तातडीने भूसंपादन करणे, जमीन अधिग्रहण करता खर्च करण्यास मंजुरी देणे शैक्षणिक विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे 36 कोटी रुपये मंजूर करणे, सांस्कृतिक भवन बांधकाम करिता , ३० कोटी रूपये मंजुर करणे, खेलो इंडिया अंतर्गत हाल मंजुर करणे, विद्यापिठात असंख्य पद रिक्त असुन ती तातडीने भरण्यात यावी, आवश्यक पदाना तातडीने मंजुरी देणे, यासह विद्यापीठांतर्गत जमीन अधिग्रहण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here