यंग चांदा ब्रिगेेडच्या पदाधिका-यांच्या कोरोना लसीकरण केंद्रांना भेटी
वंदना हातगावंकर व भाग्यश्री हांडेनी केले कार्यरत कर्मचा-यांचे अभिनंदन व काैतुक 🟤🟣चंद्रपूर🟡किरण घाटे🟣🟢कोरोनाचा प्रादूर्भाव नियत्रंणात आणण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान यंग चांदा ब्रिगेेडच्या कार्यकर्त्यांनी या लसीकरण केेंद्रांना नुकत्याच भेटी दिल्या व येथील कर्मचा-यांना अभिनंदन पत्र देवून त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, दुर्गा वैरागडे , प्राची निंनावे, आशा देशमूख, चंदा वैरागडे यांच्यासह इतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरात 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व 60 वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण केेंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर डाॅक्टर, वैद्यकीय कर्मचारी वर्ग सेवा देत असून लसीकरणाचे काम उत्तम रित्या पार पाडत आहे. अश्यातच या कर्मचा-यांच्या अडचणी समजून घेतल्या .यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शहरातील इंदिरा नगर, बाबूपेठ, शासकीय वैद्यकीय रुग्णालय चंद्रपूर, कोव्हीड सेंटर या लसीकरण केंद्रांना भेटी दिल्यात. इतकेच नाही तर त्यांचे अडचणी व समस्या तातडीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पर्यंत पोहचविण्यात आल्या असल्याचे शहर संघटिका वंदना हातगांवकर व युवती प्रमुख भाग्यश्री हांडे यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले . आमदार जोरगेवार यांनी त्यांचे समस्या व अडचणी सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी दिले . चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेड ही एक सामाजिक संघटना असुन या संघटनेचे काम वाखण्याजाेगे आहे .सामाजिक कार्यात ही संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे हे विशेष !