जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
भूतपूर्व सभापती विद्या चाैधरीच्या पत्राला दाखवली केराची टोपली
🔴चंद्रपूर🟡किरण घाटे🟤चंद्रपूर जिल्ह्यातील
चिमूर तालुक्या अंतर्गत येणा-या चिचाळा शास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहे. या इमारत बांधकाम साठी चिमूर पंचायत समिती च्या भूतपूर्व सभापती तथा पंचायत समिती सदस्य विद्या चौधरी यांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे .सदरहु गाव सहाशे लोकवस्तीचे असून या गावात जिल्हा परिषदेचे इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गां पर्यंतची शाळा आहे .शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची व्यवस्था जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा करण्यात आली आहे.उपराेक्त शाळेत गावाअतंर्गत ५ ते १० वयोगटातील लहान मुले शिक्षणाचे धडे गिरवितात.चिचाळाशास्त्री गावातील शाळेची एकमेव इमारत जिर्ण झाली असून,ती इमारत केव्हा पडेल याचा नेम नाही.
यामुळे लहान मुलांचे आयुष्य व भविष्य बघता चिमूर पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान प.स.सदस्या विद्या चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून चिचाळा शास्त्री येथे शाळेच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करावे असे वारंवार पत्र दिले.परंतू चंद्रपूर जिल्हा परिषद सिईओंनी चिचाळाशास्त्री येथे नवीन शाळा बांधकाम इमारत मंजूर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले,असल्याचे माजी सभापती विद्याताई चौधरी यांचे म्हणणे आहे. चिचाळाशास्त्री वासियांना स्वतःच्या गावातील लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळा इमारत देता का हो म्हणण्याची वेळ आली आहे.
चिचाळा शास्त्री येथे शाळेची एकच इमारत असून,सदरहु इमारती अंतर्गत वर्ग खोल्या केवळ दोन आहेत.या दोन वर्गखोल्यात १ ते ४ वर्गातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित असून विद्यार्थ्यांना शिकवितांना शिक्षकांना मात्र अडचण निर्माण होत असल्याची बाब व इमारत जिर्ण असल्याची बाब चिचाळा शास्त्री येथील नागरिकांनी माजी सभापती विद्याताई चौधरी यांचे लक्षात आणून दिली.
माजी सभापती विद्याताई चौधरी व विद्यमान पण.स.सदस्या विद्याताई चौधरी यांनी प्रत्यक्ष शाळेची पहाणी केल्यानंतर शाळा इमारतीचे जिर्ण वास्तव लक्षात आले . तदवतचं विद्यार्थ्यांची शिक्षणाबाबत होणारी गैरसोय सुध्दा या वेळी लक्षात आली.
विद्यार्थ्यांचे जिर्ण शाळा इमारती अंतर्गत धोकादायक भविष्य व आयुष्य बघता,चिचाळा शास्त्री येथे जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत मंजूर करण्यात यावे,या आशयाचे पत्र चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.परंतू मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी,नवीन शाळा इमारतीचे बांधकाम मंजूर न करता,चिमूर तालुक्यातील मौजा चिचाळा शास्त्री येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे व आयुष्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पुढे आले.
कोरोना काळात शाळा बंद आहे त्यामुळे शाळेसाठी नवीन इमारत मंजूर करून बांधून द्यावी अशी मागणी माजी सभापती तथा प.स.सदस्य विद्याताई चौधरी यांनी केली आहे.