माणिकगड सिमेंट कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करा प्रहारने केली मागणी 

0
719

माणिकगड सिमेंट कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करा प्रहारने केली मागणी 
पीण्याच्या पाण्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न, रक्षकाने केली नळाची तोड़फोड़ 

चंद्रपूर🔴🟡किरण घाटे🟡🔴
गडचांदूर शहरातील एकमेव वसाहत ,शासनाच्या वा मानवाच्या कोणत्याच मूलभूत सुविधा मिळू न देणे अश्या बंगाली कॅम्पला 35 ते 40 वर्षा पासून संघर्षमय जीवन जगण्यास भाग पडणारी माणिकगड सिमेंट कम्पनी विरुद्ध प्रहारने आता कंबर कसली अाहे . राज्यमंत्री ना.बच्चू कडु माहिला बालकल्याण विभाग याना अंगणवाडी साठी पाठपुरावा करून प्रशासकीय मंजूरी मिळवून देण्यात आली असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. बंगाली कॅम्पच्या मूलभूत सुविधा बाबत अनेक शासकीय पत्र व्यवहार केले, अनेक आंदोलने केले, निवडणुकीवर बहिष्कार टाकला, वीज वितरण कंपनी, व नगर परिषदला घेराव टाकला तरी मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही . जिल्हाधिकारी अजय गुल्हाने याना आज पर्यन्त चे सम्पूर्ण पत्र , निवेदन देऊन त्यांची भेट घेतली असता लगेच त्यांनी या विषयाबद्दल सभेचे आदेश दिले .जिल्हाधिकारी यांनी दि 23 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सभा बोलावली त्यात नगर परिषद मार्फत पाण्याची व्यवस्था करण्यास आदेश देण्यात आले. नंतर नगर परिषद ने तीन नळांची व्यवस्था बंगाली कॅम्प येथे करून दिली . पण अज्ञाना हे पाहवसे वाटले नाही दि. 20/3/2021 ला माणिकगड सिमेंट कम्पणीचे सुरक्षा अधिकारी दीपक मत्ते व त्यांचे सहका-यांनी बंगाली कॅम्प येथे येऊन नगर परिषद ने लावलेल्या नळांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तेथील रहिवासी आरडाओरड करत धावत सुटले .सुरक्षा रक्षकाला विचारणा केली असता नगर परिषदने नळ काढायला सांगितले, रहिवाश्यांना शिवीगाळ व मारण्याची धमकी सुध्दा त्या रक्षकाने दिली रहिवाश्यांचा संताप बघून दीपक मत्ते सुरक्षा अधिकारी घटनास्थळावरुन निघुन गेला एकीकळे जगात जल दिन साजरा केला जातो तर दुसरीकळे मानवाला पाणी पीण्यापासून अडवल्या जाते हे वास्तव आहे . 35 / 40 वर्षा नंतर लागलेले नळ पाहून कॅम्प च्या रहिवाश्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हाेते पण दोन दिवसातच त्यांच्या आनंदावर माणिकगड कम्पनीने विरजण टाकले .नळ ताेडफाेड प्रकरणात जिल्हाधिकारी चंद्रपुर, मुख्यधिकारी नगर परिषद गडचांदूर, पोलीस स्टेशन गडचांदूर, ला तक्रार करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना प्रहारचे सतिश बिडकर पंकज माणूसमारे, अरविंद वाघमारे, सुरज बार, महादेव बिश्वास, सत्वशीला घुले, शोभा मेश्राम,असत दत्त, विसवनाथ पतंगे, ललिता सोरते आदि उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here