जागतिक जल दिना निमित्त राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पा बाबत राज्य व केंद्र शासनाला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर
🟣उस्मानाबाद 🟣किरण घाटे🟡- जागतिक जल दिना निमित्त पाण्याचे जनजागरण व्हावे,जल एक संपत्ती असुन त्याचे संरक्षण झाले पाहिजे,गरज राहिल वास्तवतेला जल है तो कल है.पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली व भारत सरकारने एन. डब्ल्यु .डी .एच्या माध्यमातून या प्रकल्पाला चालना दिली,हा प्रकल्प लवकर पुर्ण होण्याकरिता दि.२१ मार्च २०१७ रोजी दिल्ली येथील जंतर मंतरला उपोषण करुन राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते,उपोषणानंतर या कामाला निधी उपलब्ध करून गती देण्यात आली,उषोषणापुर्वी पासुन ते आजतागायत राज्य व केंद्र सरकारकडे लेखी निवेदन देवून पाठपुरावा करीत आहे .,ज्या पध्दतीने मतदार जनजागरण,ग्राहक जनजागृती, नैसर्गिक आपत्ती बाबतचे विविध क्षेत्रातुन जनजागृती केली जाते त्याचप्रमाणे पाण्याचेही जनजागरण झाले पाहिजे. साेबतच नदी जोड प्रकल्पाला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून हा प्रकल्प लवकर पुर्ण करुन दुष्काळावर मात करावी या संदर्भात एक निवेदन सामाजिक कार्यकर्ता गणेश रानबा वाघमारे यांनी उस्मनाबाद जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य व केंद्र सरकारकडे सादर केले आहे. निवेदन देतांना अविनाश नन्नावरे, समाधान कदम उपस्थित होते.