सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर सचिवपदी निलेश पुलगमकर

0
947

सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर सचिवपदी निलेश पुलगमकर

गोंडपिपरी :- (सूरज माडूरवार)

येथिल पंचायत समितीच्या सभागृहात आज गोंडपिपरी तालुक्यातील सरपंच संघटनेची एकमताने निवड करण्यात आली.यात पोडसाचे सरपंच देविदास सातपुते यांची सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी तर हिवरा गावचे सरपंच निलेश पुलगमकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली.यावेळी संघटनेच्या सल्लागारपदी वढोलीचे सरपंच राजेश कवठे यांची निवड करण्यात आली आहे.तालुक्यातील सरपंचाच्या या सभेत ११ सदस्यीय समीतीची एकमुखाने घोषना करण्यात आली.


जानेवारी २०२१ मध्ये गोंडपिपरी तालुक्यातील दुसऱ्या टप्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या.यापुर्वी ७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या.या ७ गावात सरपंचाच्या थेट निवडी झाल्या.तर जानेवारी महिण्यात ४३ गावच्या निवडणूका पार पडल्या.असे असतांना या दोनही टप्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचानी आज एकमुखाने तालुक्यातील सरपंच संघटनेचे संघटन उभारले.यावेळी ११ सदस्यीय समीतीची एकदिलाने घोषना करण्यात आली.यात सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी तर हिवरा गावचे सरपंच निलेश पुलगमकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली.यावेळी संघटनेच्या सल्लागारपदी वढोलीचे सरपंच राजेश कवठे यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या उपाध्यक्षपदी नंदा घोघरे,कोषाध्यक्षपदी राजू राऊत,प्रसिद्धीप्रमुखपदी हेमराज चौधरी,सहसचिव सपना तामगाडगे,तर संघटनेच्या सदस्यपदी सुनिल झाडे,जया सातपुते,अर्पणा रेचनकर,निलकंठ मत्ते आदिंची एकमताने निवड करण्यात आली आहे.नवनियुक्त पदाधिकार्यांचे उपस्थित सरपंचानी अभिनंदन केले.यावेळी निवडणूकीचे कामकाज समीर निमगडे यांनी हाताळले.त्यांना सुरज माडूरवारांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here